डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या शेजारी देशांना हाताशी धरून काहीतरी मोठे करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत असतानाच आता थेट अमेरिकेचे लष्कर बांगलादेशमध्ये पोहोचले. भारताने देखील सर्तकतेची भूमिका घेतली आहे. भारताच्या पाठिमागे अमेरिकेने बांगलादेश आणि पाकिस्तानला हाताशी धरून कुरापती करण्यास सुरूवात केलीये. भारताने 50 टक्के टॅरिफनंतरही अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नसल्याने डोनाल्ड ट्रम्प हे आता भारतावर दबाव टाकण्यासाठी हद्दपार करताना दिसत आहेत. बांगलादेशच्या चटगांवमध्ये अमेरिकी सैन्याचे 100 जवान पोहोचले आहेत. दुसरीकडे यादरम्यानच भारताने देखील म्यानमारमध्ये तिन्ही लष्कराचे मिळून 120 जवान पाठवले आहेत.
बांगलादेश आणि चटगांव शहरात बंगालची खाडी रणनीतीवर आहे. मात्र, मागील आठवड्यापासून येथे अमेरिकेच्या लष्कराच्या हालचाली वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. अमेरिकेच्या वायुसेनेचे सी-130 जे हर्क्यूलिस विमान शाह अनामत विमानतळावर उतरवण्यात आले. ज्यामध्ये लष्कर आणि काही वायुसेनेचे अमेरिकेचे अधिकारी होते. हेच नाही तर अमेरिकेचे लष्कर ठाकातील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्येही थांबले होते. मात्र, त्याबद्दलची कोणतीही नोंद हॉटेलच्या रजिस्टरमध्ये नाही.
यामुळे भारताच्या विरोधात काहीतरी मोठा कट रचला जात असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. असेही सांगितले जात आहे की, हे दोन्ही देशांमधील युद्ध अभ्यास आहे…मग प्रश्न उपस्थित होतो की, याला इतकेगु्प्त का ठेवले जात आहे. हा अमेरिकेच्या मोठा रणनीतीचा भाग असल्याचेही बोलले जात आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशही अमेरिकेपुढे झुकताना दिसत आहे. त्यामध्येच अमेरिकेचे लष्कराचे विमान आणि सैन्य बांगलादेशात पोहोचले आहेत.
नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, ज्या भागात अमेरिकेच्या सैन्याच्या बांगलादेशात हालचाली वाढल्या त्याच्या बाजूच्या भारताच्या भागात भारतीय सैन्य देखील मोठ्या संख्येने रवाना करण्यात आलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या शेजारी देशांसोबत जवळीकता वाढवल्याने भारताची डोकेदुखी वाढली आहे. भारत देखील प्रत्येक बारीक गोष्टीवर नजर ठेवून आहे. नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वीच मोठी हिंसा झाली, त्यापूर्वी बांगलादेशातही उद्रेक बघायला मिळाला. आता परत बांगलादेशमध्ये अमेरिकेचे लष्कर पोहोचले आहे.