कोमसापची २० ला कुडाळमध्ये सभा
लांजा, ता. १७ ः कोकण मराठी साहित्य परिषदेची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा २० सप्टेंबरला सकाळी ११.४५ वाजता कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे आयोजित केली आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे.
या सभेत मागील वर्षीच्या जमाखर्चाचा तपशील सादर करून मंजुरी घेणे, २०२५ ते २६ चे आर्थिक नियोजनास मान्यता घेणे, कार्यकारिणीने सुचवलेल्या घटना दुरुस्तीस मान्यता देणे, सनदी लेखापाल नेमण्यास अनुमती घेणे, २०२५ ते २८ करिता निवडून आलेल्या कार्यकारिणीकडून निवड केलेल्या अध्यक्ष यांना सभेची मंजुरी घेणे, मुख्य समितींच्या निवड प्रक्रिया करून मंजुरी घेणे, कोमसाप सभासद, पदाधिकारी यांच्या सूचना, ठराव अध्यक्षांच्या परवानगीने मंजुरीसाठी ठेवणे, आयत्यावेळी येणारे विषय अध्यक्षांच्या परवानगीने पटलावर ठेवणे, अशा विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे.