संथगती वाहतुकीचा प्रवाशांना फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता १७ ः किनारीमार्गावर मंगळवारी (ता. १६) सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे दक्षिण मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या वेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पालिका अधिकारी आणि वाहतूक व्यवस्थापन पथकांनी वाहतूक कोंडीचे कारण शोधून भविष्यात अशाच परिस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना राबवण्याची अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे. तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावर पावसामुळे मुंबईकडे येताना विविध ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. जोगेश्वरी, गोरेगाव, विलेपार्ले आदी परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी मुंबईहून बोरिवलीला जाताना अनेक भागात वाहतूक ठप्प झाली होती. फ्री वेवरदेखील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा फटका बसला.