शारदीय नवरात्रीनिमित्त कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन
मुलुंड, ता. १७ (बातमीदार) ः शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन केले आहे. श्रीचंडीकोपास्तिदीपिका ग्रंथामध्ये कुंकवाचे महत्त्व कथन केले आहे. तसेच कुमारिका पूजनाला नवरात्रीमध्ये खूप महत्त्व आहे. पूजन सोहळा हा कुंकुमार्चननंतर होईल. ज्यांना काही वस्तू कुमारिकांना द्यावयाच्या असल्यास त्यांनी मी मुलुंडकर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मयूरा बाणावली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मुलुंड पूर्वेतील सुयोग हॉल येथे रविवारी (ता. २८) सकाळी साडेआठ वाजता आयोजित करण्यात आला आहे.