Vanshawal: जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वंशावळ हवी? पण वंशावळ म्हणजे काय अन् कशी काढायची?
Saam TV September 19, 2025 12:45 AM
  • जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वंशावळ दाखला महत्त्वाचा कागदपत्र आहे.

  • वंशावळ म्हणजे कुटुंबाच्या पूर्वजांचा आणि पिढ्यांचा इतिहास.

  • हा दाखला स्थानिक महसूल कार्यालयातून अर्ज करून मिळवता येतो.

  • कुणबी किंवा ओबीसी प्रमाणपत्रासाठी वंशावळची पूर्तता करणे अनिवार्य आहे.

सरकारने मराठा समाजाला ओबीसीप्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केल्यानंतर जातीचं प्रमाणपत्र काढण्यास रांग लागलीय. कुणबी प्रमाणपत्र किंवा जातीचं प्रमाणपत्र मिळवायचे असेल अर्जदाराला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. या कागदपत्रांमध्ये वंशावळ दाखला देखील लागत असतो. जर वंशावळचा दाखल नसला तर जातीचं प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण होतात.

Maratha-Kunbi caste certificate: मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसं मिळवणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

पण आपल्यातील अनेकांना वंशावळ म्हणजे काय, ते कसं मिळवायचं असा प्रश्न पडला असेल. आपण आज दोन्ही प्रश्नांचे उत्तर या लेखातून जाऊन घेऊ. वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास. आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती यात नमूद केलेली असते. आपल्या आधीच्या पिढीतील पहिल्या व्यक्तीपासून तर आता अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंतची माहिती नाव क्रमवार उतरत्या स्वरूपात लिहिलं असते. त्या कागदपत्राला वंशावळ म्हणतात. तर इंग्रजीत फॅमिली ट्री असं संबोधलं जातं.

Jivant Satbara: 'जिवंत' सातबारा म्हणजे काय रं, तात्या? वंशावळ कशी काढतात?

जर तुम्हाला वंशावळ काढण्याची असेल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील आधीच्या पिढीमधील व्यक्तींची नाव उतरत्या क्रमानं लिहावी लागतील. जसे की, आधी खापर पणजोबा, मग पणजोबा, त्यानंतर आजोबा, आजोबाची मुलं, आजोबांच्या मुलांची मुलं अशी नावं उतरत्या क्रमाने लिहा.

तर ज्या व्यक्तीचा जातीचा दाखला काढायचा आहे, त्याच्या नावापर्यंत ही वंशावळ लिहावी लागते. याचा रेकॉर्ड तहसील कार्यालयात जुने हक्क नोंदण्यांमध्ये आढळत असतो. कोतवाल बुकामध्ये जन्म-मृत्यूची नोंदवही असते, त्यात कुटुंबाच्या पूर्वजाचा इतिहास मिळत असतो. तसेच जुन्या शैक्षणिकनोंदींमध्येही पूर्वजांच्या जातीचा उल्लेख आढळत असतो. आजोबा शिकलेले असतील आणि त्यांनी जातीची नोंद केलेली असेल तर तिथेही नोंद आढळते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.