नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या स्मरणार्थ राज्यात बुधवार (ता. १७)पासून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरू करण्यात आले आहे. सिद्ध पिंप्री (ता. नाशिक) येथून या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
अभियानाच्या उद्घाटनास राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार सरोज अहिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सरपंच भाऊसाहेब ढिकले आणि ग्रामपंचायत अधिकारी दौलत गांगुर्डे उपस्थित होते.
अभियानात गाव विकास आराखडा तयार करणे, निधीचा परिणामकारक वापर, गावातील स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, शैक्षणिक उन्नती आणि डिजिटल पंचायत या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे. जलसंपदा मंत्री महाजन यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामस्थांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
आमदार अहिरे यांनी गावाचा विकास करताना पर्यावरणपूरक उपाययोजना कराव्या आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची वाढ कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे, असे सांगितले. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ ही ग्रामपंचायतींच्या सर्वंकष विकासाची निकोप स्पर्धा असल्याचे सांगितले व प्रत्येक ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
शालेय शिक्षणमंत्री दाभाडीला
याच अभियानाचा प्रारंभ राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दाभाडी (ता. मालेगाव) येथे केला. त्यांनी लोकसहभागातून अभियान यशस्वी करण्याचे महत्त्व सांगितले आणि प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावात नावीन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात, असे आवाहन केले.
मंत्री महाजन म्हणाले...
साधुग्रामबाबत आठ दिवसांत निर्णय,
अतिरिक्त ५०० एकर जागेचे अधिग्रहण.
शहरातील खड्डे बुजविण्यासाठी
महापालिकेला अल्टिमेटम.
सहा हजार कोटींचा रिंगरोड,
रिंगरोडसाठी केंद्राचा ५० टक्के निधी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १७ ते १८ कामांमध्ये क्लब टेंडरिंग.
गोदावरी नदी वाहती ठेवण्यासाठी बेजे धरणातून ३५० कोटींची पाणीपुरवठा योजना.
रामतीर्थावरील वस्त्रांतरगृह पाडणार.
Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रकशहरातील अतिक्रमणे हटविणार.
कुंभमेळ्यापूर्वी द्वारका जंक्शनचे काम.
आपत्ती व्यवस्थापनासाठी १२ अग्निशमन बंब.
मेरी, खादी ग्रामोद्योगच्या जागेवर
टेंटसिटीची चाचपणी.
शहरात तीन हजार सीसीटीव्ही बसविणार.
त्र्यंबकेश्वरमध्ये एक हजार सीसीटीव्ही.
रेल्वेस्थानकावर होल्डिंग एरिया.
मध्य प्रदेशच्या धर्तीवर नदीघाट.