Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक
esakal September 19, 2025 03:45 AM

Indian Railways Special Trains : भारतीय रेल्वेने नवरात्रोत्सवापासून दिवाळीपर्यंत प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची सोय उपलब्ध करून दिली आहे. २६ सप्टेंबरपासून नोव्हेंबर अखेरपर्यंत देशभरात ६,००० हून अधिक विशेष गाड्या धावणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या मते, दिवाळी (Diwali Special Trains) आणि छठ पूजा यासारख्या सणांच्या काळात प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

देशभरातील विविध राज्यांसाठी विशेष गाड्या

उत्तर रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, या विशेष गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आणि आसामसह अनेक राज्यांसाठी चालवल्या जाणार आहेत. सणांच्या काळात घरी परतणाऱ्या प्रवाशांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी रेल्वेने विशेष योजना आखली आहे. तसेच, अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन स्थानकांवर विशेष व्यवस्था केली जाणार आहे.

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा विशेष गाड्यांचा तपशील

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार,

  • जबलपूर – दानापूर विशेष गाडी : २६ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर दर बुधवार आणि शुक्रवारी धावणार

  • मुंबई सेंट्रल – काठगोदाम : १ ऑक्टोबरपासून सुरू

  • उधना – सुभेदारगंज : ३ ऑक्टोबरपासून सुरू

  • वांद्रे टर्मिनस – बडनी : ६ ऑक्टोबरपासून सुरू

  • आनंद विहार – भागलपूर : २० सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दररोज धावणार

  • कोलकाता – लखनऊ : २ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर चालणार

  • मऊ – उधना : २७ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर दर शनिवारी धावणार

अतिरिक्त सोयी

दिवाळी आणि छठच्या काळात गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे रेल्वेने काही अतिरिक्त डबे राखीव ठेवले असून, ते जास्त गर्दी असलेल्या मार्गांवर चालवले जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.