माढा : माढा तालुक्यातील सिना नदीकाठच्या गावात आलेला पूर हळूहळू ओसरत असला तरी घरातील चिखलाचा राडारोड, भुईसपाट झालेली पिके, उघड्या पडलेल्या पाईपलाईन, वाहून गेलेली माती, खचलेले बांध, चिखलाने भरलेले गाईगुराचे गोठे अशा अनेक समस्या शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकल्या असून अगोदरच खरीप हंगाम वाया गेला असून रब्बीच्या हंगामाच्या तोंडावर पुराने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटास सामोरे जात आहे. अर्थात पूरस्थिती आणखी पूर्णपणे ओसरली नसून शेतकऱ्यांच्या शेतात अनेक ठिकाणी पाणी साठलेले आहे. उद्ध्वस्त झालेली शेती आणि मोडून पडलेला संसार पुन्हा उभारण्यासाठी शेतकरी कंबर कसू लागला असून शासनाने त्याच्या पाठीशी राहण्याची आवश्यकता आहे.
माढा तालुक्यामध्ये सीना नदीकाठी परंडा तालुक्यातील सीना कोरेगाव धरणातून पाणी सोडल्याने मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पुराचे पाणी हळूहळू ओसरून माढा - वैराग व इतर रस्त्यांची वाहतूक सुरळीत होऊ लागली आहे. मात्र शेतकऱ्यापुढे पूर्व विसरला तरी मोठे संकट उभे ठाकले आहे. शेतात उभे असलेली उसाची पिके पुराच्या पाण्यामुळे भुईसपाट झालेली आहेत. पूर ओसल्यानंतर खऱ्या संकटाला शेतकऱ्याला सामोरे जावे लागत आहे.
शेतातील उडीद मका यासारखी किती हातची गेली आहेत तर नगदी पिकास ले ऊस हे दोन्ही सपाट झालेले शेतकऱ्यांना आपल्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे. ओसरणाऱ्या पुराबरोबरच शेतकऱ्यांने यंदा चांगली दिवाळी करण्याची पाहिलेली स्वप्नही ओसरू लागली आहेत. अनेक ठिकाणी शेतातील पाईपलाईन उघड्या पडलेल्या आहेत. बांध फुटलेले आहेत. शेतातील माती वाहून गेली आहे. काही ठिकाणी माती, शेतातील भराव खचलेला आहे. एक नाही अनेक संकटांना शेतकऱ्यांना घेरले असून विद्युत मोटारी पाण्याखाली गेलेल्या आहेत. विद्युत जनित्राभोवती पाणी आहे.
दारफळ भागातील व काही गावातील वाड्यावर त्यामध्ये आणखीनही पुराचे पाणी आहे. रस्ते, बांध खचल्याने, शेताकडे जाणारी रस्तेही पाण्याखाली असल्याने व शेतात पाणी असलेले अनेक शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतापर्यंत अद्यापही जाता आलेले नाही. त्यामुळे नुकसानीचा नेमका अंदाज शेतकऱ्यांना लागत नाही. कारण हे पाणी ओसायला आणखी काही दिवस लागणार आहेत.
ही परिस्थिती माढा तालुक्यातील सीना नदीकाठी असणाऱ्या रिधोरे, तांदुळवाडी, निमगाव (माढा), राहुलनगर, दारफळ उंदरगाव, केवड, वाकाव, खैराव, कुंभेज यासह अनेक गावांमध्ये गावांमध्ये दिसून येत आहे.