मोशी, ता.१८ : मोशीतील शिवरस्ता ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने बुधवारी मराठवाडा मुक्ती स्वातंत्र्य दिन सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी व्याख्याते रवींद्र आंबेकर, नंदकिशोर लोखंडे, अनिल दिवेकर, दामोदर पाटील, संजय मोरे, विजय देशमुख, तात्यासाहेब अतकरे, चंद्रकांत कुंभार, विलास जाधव आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
नवनीत सोनार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस दशरथ जाधव, दत्तात्रेय कदम यांनी तर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस दिलीप शिरूरकर यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
याप्रसंगी रवींद्र आंबेकर, सुभाष कुलकर्णी रायभान गजभिये, दत्ता नरवडे यांची भाषणे झाली.