आशिया कप स्पर्धेतील सुपर 4 फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. अ गटातून भारत पाकिस्तान आणि ब गटातून श्रीलंका बांग्लादेश हे संघ सुपर 4 फेरीत जागा मिळवण्यास यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे भारत आणि ओमान यांच्यातील सामना औपचारिक आहे. या सामन्यात भारतीय संघाला धार करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे खेळाडूंचा फॉर्म तपासता येणार आहे. या सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने संघात दोन बदल केल्याचं जाहीर केलं. पण अचानक त्याला रोहित शर्माची आठवण झाली. त्याने रोहित शर्माचं प्लेइंग 11 जाहीर करताना एकच हास्यकल्लोळ झाला. कारण सूर्यकुमार यादवला संघातून वगळलेल्या दुसऱ्या खेळाडूचं नाव आठवेना. त्यावेळी त्याने रोहित शर्माचं नाव घेतलं.
सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार केला आहे. या स्पर्धेत आम्ही प्रथम फलंदाजी केलेली नाही आणि आम्हाला आमची खोली जाणून घ्यायची आहे. सुपर 4मध्ये खेळण्यासाठी वेळ असणे महत्वाचे आहे. आम्हाला पहिल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही करत असलेल्या चांगल्या सवयी चालू ठेवायच्या आहेत आणि ते करत राहायचे आहे. ते छान दिसत आहे आणि आमचे सलामीवीर त्याचे पुढे मूल्यांकन करतील. आमच्यात संघात दोन बदल आहेत. हर्षित राणा खेळत आहे. तसेच आणखी एक खेळाडू खेळत आहे. मी रोहितसारखा झालो आहे.’ सूर्यकुमार यादवला दुसऱ्या खेळाडूचं नाव आठवेना तेव्हा त्याने रोहित शर्माचा उल्लेख केला.
सूर्यकुमार यादवला अर्शदीप सिंगचं नाव आठवलं नाही. कारण दुसरा बदल असलेला खेळाडू अर्शदीप सिंग आहे. तर जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांना आराम दिला आहे. तर अर्शदीप सिंग आणि हार्षित राणा यांना संधी दिली आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव