भारताने आशिया चषकातील शेवटच्या साखळी सामन्यात ओमानविरुद्ध दोन बदलांसह खेळण्याचा निर्णय घेतला.
जसप्रीत बुमराह व वरुण चक्रवर्तीला विश्रांती देण्यात आली, त्यांच्या जागी हर्षित राणा व अर्शदीप सिंग आले.
नाणेफेक जिंकून सूर्यकुमार यादवने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण दुसऱ्या बदलाचं नाव तो विसरला.
India vs Oman Marathi Live Update Cricket : भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात ओमानविरुद्ध दोन बदलांसह मैदानावर उतरला आहे. जसप्रीत बुमराह व वरुण चक्रवर्थी यांना विश्रांती दिली गेली. नाणेफेक जिंकून सूर्यकुमार यादवने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु संघात दोन बदल कोणते केलेत हेच तो विसरला. त्याने हर्षित राणाचं नाव घेतलं, परंतु दुसरा खेळाडू कोण, हेच तो विसरला. तो दुसरा खेळाडू अर्शदीप सिंग असल्याचे संघाची यादी समोर आल्यावर समजले.
सूर्याप्रमाणे ओमानचा कर्णधार जतिंदर सिंग याचीही तशीच अवस्था झाली. तोही प्लेइंग इलेव्हनमधील दोन बदल कोणते हे विसरला. रवी शास्त्रींनी लगेच परिस्थिती हाताळली आणि नावं विसरणारा तू एकटाच नाहीस, असे त्याला म्हटले. दरम्यान, भारताचा हा २५० वा ट्वेंटी-२० सामना आहे आणि पाकिस्ताननंतर ( २७५) हा टप्पा ओलांडणारा भारत हा जगातला दुसराच संघ आहे.
ओमानचा संघ - जतिंदर सिंग, आमीर कलीम, हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला, शाह फैझल, मोहम्मद नदीम, आर्यन बिस्त, झिक्रीया इस्लाम, शकील अहमद, समय श्रीवास्तव, जितेश रामानंदी.
IND vs OMN : दोन बदलांसह भारत मैदानावर उतरला; सूर्यकुमार यादव खेळाडूंची नावं विसरला! म्हणाला, माझा रोहित झालाय...भारताचा संघ - अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
शकील अहदमने पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्मासाठी DRS घेतला. नशीबाने तो नाबाद राहिला. पाकिस्तानविरुद्ध ३ विकेट्स घेणाऱ्या शाह फैसलने भन्नाट चेंडूवर शुभमन गिलचा ( ५) ऑफ स्टम्प उखडून टाकला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला संजूही फैसलच्या गोलंदाजीवर गांगरला.. फैसलने ते षटक निर्धाव फेकून ओमानला एक महत्त्वाची विकेट मिळवून दिली. पुढील षटकांत अभिषेकने उत्तुंग षटकार खेचले आणि संजूनेही फैसलच्या पुढच्या षटकात जबरदस्त षटकार खेचून संघाला ३.३ षटकांत १ बाद २८ धावांपर्यंत पोहोचवले.