राहुरीत ४ सख्ख्या बहिणींवर अत्याचार.
एक तरूणी विवाहित.
तीन मुली अल्पवयीन.
अहिल्यानगरच्या राहुरीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. चार सख्ख्या बहिणींवर नातेवाईकानेच वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. चारही पीडित मुली नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. एकीचं लग्न तर ३ मुली अल्पवयीन असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
चारही मुली नाशिक येथील रहिवासी आहेत. पीडित मुलींचे आई वडील हे काही कारणास्तव विभक्त झाले होते. त्यामुळे त्यांच्या ४ मुली दुरच्या नातेवाईकांकडे राहत होत्या. दूरच्या नातेवाईक त्यांचा सांभाळ करत होता. मात्र, त्या नातेवाईकाचीच चार मुलींवर वाईट नजर होती. त्यानं चारही मुलींवर लैंगिक अत्याचार केला.
नाशिककरांनो पाणी जपून वापरा, शनिवारी शहरात पाणी नाही, रविवारीही.. नेमकं कारण काय?एका तरूणीचे नुकतेच लग्न झाले होते. चार महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता. ती ३ बहिणींसोबत राहत नव्हती. ती बहिणींना भेटण्यासाठी राहुरी तालुक्यात आली होती. नंतर तिच्यावरही नराधमानं अत्याचार केला. अल्पवयीन मुलींपैकी एक १६, दुसरी १४, आणि तिसरी १० वर्षांची होती.
रत्नागिरीच्या MIDCमध्ये वेश्याव्यवसाय, पुण्यातील २ तरूणींच्या मदतीनं देहविक्री सुरू; पोलिसांकडून पर्दाफाशनातेवाईकाच्या याच त्रासाला कंटाळून तिनं पोलीस ठाण्यातधाव घेतली. तसेच नराधमाविरोधात तक्रार दाखल केली. मोठ्या बहिणीच्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी बजरंग कारभारी साळुंखे, एका महिलेसह इतर दोन आरोपी, अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी बजरंग कारभारी साळुंखे याला तत्काळ ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
ग्राहकांसाठी खुशखबर! सणासुदीला सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; पाहा २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर