कराड (जि. सातारा) : कराड बसस्थानक (Karad Bus Stand) परिसरात असलेल्या एका मोबाईल शॉपीमध्ये (Mobile Shop) शुक्रवारी रात्री घडलेल्या वादातून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अखिलेश नलवडे असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
तीन दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या मोबाईलचा कॅमेरा (Mobile Camera) नीट काम करत नसल्याने अखिलेश आपल्या दोन मित्रांसह दुकानात तक्रार नोंदवण्यासाठी गेला होता. यावेळी दुकानात फरशी पुसण्याचे काम सुरू होते.
धर्मस्थळ परिसरात सापडलेल्या 5 कवट्या, 113 हाडे फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवणार; झाडाला दोरी अन् एक साडीही आढळलीदरम्यान, चप्पलमुळे फरशीवर घाण गेल्याच्या कारणावरून दुकानातील कर्मचारी आणि अखिलेश यांच्यात वादावादी सुरू झाली. वाद चिघळताच दोघांमध्ये झटापट झाली. त्यात अखिलेश खाली पडला व त्याची शुद्ध हरपली.
तत्काळ त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी अजीम मुल्ला या तरुणाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास व कारवाई कराड पोलिस करत असून या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे.