आधार ते पॅन कार्डपर्यंत… जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर कागदपत्रांचे काय करावे?
Sarkarnama September 20, 2025 06:45 PM
Aadhar or pan card मृत व्यक्तींची ओळखपत्रे

आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे काय करायचे, हा प्रश्न अनेकदा समोर येतो. मृत व्यक्तींची ओळखपत्रे आणि कागदपत्रांचा गैरवापरासाठी वापरला जाण्याचा धोका असतो.

Aadhar or pan card पूर्णपणे रद्द करण्यासाठी

फसवणुकीचे प्रकार वाढण्याची शक्यता टाळण्यासाठी ही कागदपत्रे योग्य वेळी बंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी काय करावे, याबद्दलची माहिती आपण जाऊन घेऊया.

Aadhar or pan card आधार कार्ड

मृत व्यक्तीचे आधार कार्ड पूर्णपणे रद्द करण्याची सोय सध्या उपलब्ध नाही. मात्र, ते लॉक करता येते. यासाठी UIDAI (Unique Identification Authority of India) शी संपर्क साधावा लागतो.

Aadhar or pan card मृत्यूची नोंद

मृत्यूची नोंद देऊन संबंधित आधार आयडी लॉक करण्याची विनंती करता येते. जवळच्या आधार केंद्रालाही भेट देऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येते. आधार कार्ड लॉक झाल्यानंतर त्याचा वापर कोणत्याही नवीन व्यवहारासाठी करता येत नाही.

Aadhar or pan card पॅन कार्ड

मृत व्यक्तीच्या पॅन कार्डाचा गैरवापर टाळण्यासाठी आयकर विभागाशी संपर्क करणे आवश्यक आहे. यासाठी मृत्यू प्रमाणपत्र आणि आधार कार्ड सोबत घेऊन विभागाकडे जावे लागते.

Aadhar or pan card आर्थिक व्यवहारात

संबंधित व्यक्तीचा पॅन नंबर देऊन ते ब्लॉक करण्याची विनंती करता येते. एकदा पॅन निष्क्रिय झाल्यानंतर त्याचा कोणत्याही आर्थिक व्यवहारात वापर होणार नाही.

Aadhar or pan card मतदार ओळखपत्र

मृत व्यक्तीचे मतदार ओळखपत्र रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाशी संपर्क साधावा लागतो. यासाठी फॉर्म 7 भरून सादर करावा लागतो.

Aadhar or pan card मतदार यादीतून वगळले जाते

मृत्यू प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या छायांकित प्रती सोबत द्याव्या लागतात. त्यानंतर संबंधित व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळले जाते.

Next : जयंत पाटील यांचे शिक्षण किती? अचानक यावं लागलं होतं राजकारणात येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.