सोलापूर : बहुप्रतीक्षित असलेल्या सोलापूर विमानतळावरून मुंबई आणि बंगळूरसाठीच्या विमान सेवेला अखरे मुहूर्त मिळाला आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनची सोलापूरकरांची असलेली प्रतीक्षा आता संपणार आहे. या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या उड्डाणासाठी २० सप्टेंबरपासून तिकीट बुकिंगला सुरवात केली जाणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.
सोलापूरविमानतळावरुन विमान कधी उडणार याची अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा आणि चर्चा सुरु होती. मात्र काही अडचणींमुळे हि विमानसेवा सुरु होत नव्हती. दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक तारख्या समोर आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात विमानसेवा सुरु होण्यात अडचणी येत होत्या. अखेर मुंबई आणि बंगळूरसाठी विमानसेवा दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे १५ ओक्टोम्बरला पहिले उड्डाण होणार आहे.
Nanded : व्हिडीओ करत दिला इशारा, नुकसानग्रस्त शेतकऱ्याची नदीत उडी; पुराच्या पाण्यात उडी घेत गावकऱ्यांनी वाचविला जीव२० सप्टेंबरपासून तिकीट बुकिंग
सोलापूर- मुंबईआणि सोलापूर- बंगळुरू या दोन्ही ठिकाणी सुरु होत असलेल्या विमानसेवेसाठी तिकिट बुकिंगला २० सप्टेंबरपासून सुरवात केली जात आहे. सोलापूरमध्ये काही दिवसांपूर्वीच सोलापूर- गोवा विमानसेवा सुरु करण्यात आली. या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळतोय. यानंतर सोलापूरकरांसाठी मुंबई व बंगळूरला जाणे सहज सोपे होणार आहे. अर्थात सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी वर्गाला याचा अधिक फायदा होणार आहे.
Sangola Heavy Rain : सांगोल्यात पावसाने दाणादाण; एकाच दिवशी १७० मिलिमीटर पावसाची नोंद, पिकांचे मोठे नुकसानअसे असणार उड्डाण
मुख्यमंत्री फडणवीस देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असून याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान १५ ऑक्टोबरला दुपारी १२.५५ मिनिटांनी सोलापूर- मुंबई असे पहिले उड्डाण होणार आहे. यानंतर दुपारी २.४५ वाजता मुंबई- सोलापूर विमानसेवेस प्रारंभ होईल. तर सकाळी ११.१० वाजता बंगळूरू-सोलापूर आणि दुपारी ४.१५ वाजता सोलापूर-बंगळूरू असणार विमानसेवा सुरु होईल