Maharashtra Politics Live Update : हिंगोलीत शिवसैनिकांनी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणेंची गाडी अडवली
Sarkarnama September 20, 2025 09:45 PM
Hingoli News : हिंगोलीत शिवसैनिकांनी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणेंची गाडी अडवली

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी हिंगोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. या वेळी शिवसैनिकांनी काही वेळ कृषिमंत्री भरणे यांची गाडी अडवली होती. मात्र, पोलिसांनी शिवसैनिकांना बाजूला केल्यानंतर कृषिमंत्री नियोजित स्थळाकडे रवाना झाले. ओला दुष्काळ जाहीर करा नाही तर खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी या वेळी शिवसैनिकांनी केली.

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एक लाख ६६ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एक लाख ६६ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे, असा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने दिला आहे. अजूनही पाऊस सुरू झाली आहे, त्यामुळे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Pratap Sarnaik : 17 हजार 450 जागांसाठी एसटी महामंडळात भरती

एसटी महामंडळाकडून महत्त्वाचा, मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून 17 हजार 450 कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या देण्यात येणार आहेत. यात चालक आणि सहाय्यक अशा पदांसाठी भरती होणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Bachhu Kadu : सत्ता आल्यानंतर शेतकरी हिंदू नसतो

सरकारमध्ये असलेला पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर दिसत नाही. प्रशासन देखील नुकसानीचा अर्धा सर्वे करतात. भारताची नेपाळपेक्षा वाईट अवस्था सध्या आहे. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाहीत. बावनकुळे यांना अमरावतीत आल्यानंतर गणपती, दहीहंडी साठी वेळ मिळतो. शेतकरी सध्या वाऱ्यावर आहे. निवडणुकीच्या आधी शेतकरी फक्त हिंदू असतो. सत्ता आल्यानंतर शेतकरी हिंदू नसतो” अशी बोचरी टीका बच्चू कडू यांनी केली.

पडळकरांची विधानं हा भाजपच्या मोहिमेचा भाग; सचिन सावंत यांची कडवी टीका

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हे वक्तव्य महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला व राजकीय परंपरेला शोभणारे नसल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडून करण्यात आली आहे. भाजपाच्या मोहिमेचा भाग म्हणूनच अशा वादग्रस्त विधानांना प्रोत्साहन दिले जाते, असा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांना अस्वस्थ करणे, तपास यंत्रणांचा वापर करून दडपशाही करणे आणि माध्यमांवर दबाव आणणे ही भाजपाची ठरलेली रणनीती असल्याचेही सांगितले गेले.

पुणे पोलीस दलात होणार मोठी भरती; लवकरच सुरू होणार प्रक्रिया

Pune News : पोलीस दलामध्ये काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून लवकरच एका मोठ्या पोलीस भरतीची घोषणा होणार आहे. पुणे पोलीस दलामध्ये एक मोठी भरती होणारातून त्याबाबतच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

जयंत पाटील समर्थांचा पडळकरांविरोधात रास्ता रोको

आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर मर्यादा सोडून केलेल्या टीकेबाबत इस्लामपूर येथे समर्थांकांकडून रास्ता रोको.

शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात धरणे आंदोलन

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त करत आंदोलन केले. शरदचंद्र पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी नागपूरच्या व्हेरायटी चौकात पडळकर यांच्या विरोधात जोरदार निषेध नोंदवला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून पडळकर यांच्यावर तक्रार केली.

भावनगरमध्ये पंतप्रधान मोदींचा भव्य रोडशो Aditi Tatkare : E-KYC प्रक्रिया लाडक्या बहिणींच्या हिताची !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया लवकरात लवकर करावी. ही प्रक्रिया आपल्या सर्वांच्या हितासाठीच असून यामुळे लाडक्या बहिणींच्या सन्मान निधी वितरणात सुलभता व सुसूत्रता येणार आहे.

PM Modi Tweet : कार्यक्रमाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट –

"आज, 20 सप्टेंबर हा भारताच्या समुद्री क्षेत्रासाठी आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. सकाळी सुमारे 10:30 वाजता भावनगर येथे ‘समुद्र से समृद्धि’ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात 34,200 कोटी रुपयांहून अधिक कामांचे उद्घाटन किंवा शिलान्यास केला जाईल. यामुळे देशभरातील जनतेला फायदा होईल. तसेच शिपिंग क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या धोरणांवरही आपले लक्ष केंद्रीत राहील."

Narendra Modi : पंतप्रधान मोदींची गुजरातला भेट; 34,200 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण भावनगरमध्ये मोदींचा रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भावनगर येथे रोड शो आणि जनसभेत सहभागी झाले. या वेळी शिपिंग व पोर्टशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात येणार आहे. भावनगरच्या विकासाला गती मिळावी आणि रोजगाराच्या संधी वाढाव्यात, यासाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरणार असल्याचे मोदींनी सांगितले.

आठ महिन्यात ३.४१ लाख जातवैधता प्रमाणपत्रांचे वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत विकसित ऑनलाईन पोर्टलद्वारे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. राज्यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून जानेवारी २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत ३ लाख ४१ हजार ९७३ विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असल्याची माहिती ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांनी दिली.

दौंड येथे सेवा पंधरवड्यात ५०० हून लाभपत्राचे वितरण

दौंड तालुक्यात सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत तालुक्याचे आमदार राहुल कूल यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ५०० हून अधिक लाभपत्राचे श्रीकृष्ण मंगल कार्यालय, बोरीपार्धी, चौफुला येथे वितरण करण्यात आले. नागरिकांना सेवा पंधरवडा उपक्रमात सहभागी होऊन सेवांचा लाभ घेण्याचे प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले.

इस्लामपूरात आज बंद

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याच्या निषेधार्थ इस्लामपूर बंदची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आले.

उद्धव ठाकरे हे ४ ऑक्टोबरला पुणे दौऱ्यावर

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा ४ ऑक्टोबर रोजी पुणे दौरा येणार आहेत.ते स्थानिक स्वराज्य निवडणुकीची तयारी संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. पक्षाचे एकदिवशीय शिबिर देखील आयोजित केले जाणार असल्याची माहिती आहे.

गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य म्हणजे आईला शिवी - विजय वडेट्टीवार

गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य म्हणजे आईला शिवी आहे.राजकीय नेत्यांना शिव्या द्या पण आई वडिलांना शिव्या देणे योग्य नाही. पडळकर कुणाच्या इशाऱ्यावर बोलत आहे, कोण त्याला पाठीशी घालत आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नव्हती ही पद्धत भाजपने सुरू केली आहे एखाद्याच्या आईवर बोलणे हे कोणते संस्कार आहेत? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.