कोंढाळी : नागपूर अमरावती राज्यमार्गावरील जिनिंग प्रेस समोर गुरुवारी (ता.१८) रात्री झालेल्या भीषण अपघातात टाटा एस गाडीने उभ्या ट्रकला धडक दिल्याने क्लीनरचा जागीच मृत्यू झाला.
कृष्णा देवराव कुकडे (वय ३४, रा. बोंडा पांढरी, ता. हिंगणा, जि. नागपूर) असे मृतकाचे नाव आहे. राकेश रामेश्वर मरसकोल्हे (वय ३४, रा. बोंडा पांढरी) हा दीपक ट्रान्सपोर्टची टाटा एस (एमएच ४० बीएल ५३९५) गाडी घेऊन नागपूर येथून अमरावतीकडे निघाला होता.
दरम्यान, नांदोरा शिवारातील तवाकाळ जिनिंग प्रेससमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अशोक लेलँड ट्रक (सीजी ०८ बी ८४९८) वर टाटा एस गाडीने जोरदार धडक दिली. अपघातात कृष्णा कुकडे याच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कोंढाळी पोलिस स्टेशनचे पो.उ.नि. संकेत नानोटी, नितेश राठोड व तीन होमगार्ड घटनास्थळी दाखल झाले.
Accident News: नवी मुंबईत अपघाताचे सत्र, तिघांचा मृत्यूतसेच सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड, प्रज्वल धोटे व त्यांच्या मित्रांनी मदतकार्य केले. या प्रकरणी पोलिसांनी चालक राकेश मरसकोल्हे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.