नागपूर : हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे मॉन्सूनने यंदाही विदर्भावर बंपर कृपा केली आहे. संपूर्ण पावसाळाभर वरुणराजा मेहेरबान राहिल्याने अकराही जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. नागपूर व विदर्भातील जवळपास सर्वच जलाशये तुडुंब भरली असून, उन्हाळ्यातील संभाव्य जलसंकटही दूर झाले आहे.
पावसाळा संपायला अजून दहा-बारा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मॉन्सून लवकरच विदर्भातूनही निरोप घेण्याची शक्यता आहे. परतीचा प्रवास सुरू असताना मॉन्सूनने जाताजाता विदर्भाला मागील आठवड्यात जोरदार दणका दिला.
Marathwada Rain: पाऊस सरासरीच्या पुढे! मराठवाड्यातील चित्र, गणेशोत्सवानंतर जोरमागील काही दिवसांमध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसल्याने उरलासुरला बॅकलॉग भरून निघाला आहे. यावर्षी विदर्भात मॉन्सूनचे लवकर आगमन झाल्यानंतर पावसाने सुरवातीला जूनमध्ये घोर निराशा केली होती. मात्र त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये दणकेबाज पाऊस झाला.
प्रादेशिक हवामान विभागाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार, विदर्भात आतापर्यंत (१ जून ते १९ सप्टेंबर) एकूण ९७४ मिमी पाऊस पडला, जो सरासरीच्या (८९४ मिमी) सहा टक्के आहे. आकडेवारीत सर्वाधिक २३ टक्के पाऊस वर्धा जिल्ह्यात, तर सर्वात जास्त एकूण पाऊस गडचिरोली जिल्ह्यात १४५४ मिमी पाऊस बरसला आहे. नागपूर जिल्ह्यातही सरासरीच्या सात टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली.
उल्लेखनीय म्हणजे, विदर्भातील अकराही जिल्ह्यांनी पावसाची सरासरी गाठली आहे. उल्लेखनीय म्हणजे, हवामान विभागाच्या भाषेत २० मिमी किंवा त्याखालोखाल पाऊस सरासरी मानला जातो. दमदार पावसामुळे विदर्भातील बहुतांश जलाशये काठोकाठ भरली असून, शेतमालांचीही स्थिती सध्या समाधानकारक आहे. त्यामुळे साहजिकच बळीराजा खूश आहे.
Nashik Monsoon: अवघ्या ३५ मंडळांनी गाठली पावसाची सरासरी; परतीच्या पावसावर जिल्ह्याचे भवितव्य अवलंबूनविदर्भातील पावसाची आकडेवारी (मिमीमध्ये) जिल्हा प्रत्यक्ष पाऊस सरासरी पाऊस टक्केवारी
वर्धा ९७६ ७९६ अधिक २३
गडचिरोली १४५४ १२४० अधिक १७
नागपूर ९५५ ८९६ अधिक ७
चंद्रपूर ११७९ १०३१ अधिक १४
यवतमाळ ९१३ ७६९ अधिक १९
वाशीम ८४४ ७३२ अधिक १५
बुलडाणा ६४८ ६०६ अधिक ७
भंडारा १०५४ १०४१ अधिक १
गोंदिया ११०४ ११७० उणे ६
अकोला ६०१ ६५४ उणे ८
अमरावती ६९६ ७७९ उणे ८