Gold Rate Today : सोनं पुन्हा महागणार? 'हे' ठरणार कारण...रिपोर्टमध्ये धक्कादायक दावा! आजचा भाव काय?
esakal September 21, 2025 01:45 AM

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होते आहे. या किमती रोज नवनवीन विक्रम प्रस्तापित करत आहेत. भारतात आज २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख १२ हजार ७४० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४३ हजार ३७६ रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे. याशिवाय अमेरिकेत सोन्याचे दर ३६०० डॉलर पर्यंत पोहोचले आहेत. मात्र, सोन्याचे दर दुप्पटीने वाढू शकतात, अशा दावा अमेरिकन फर्म जेफरीजने केला आहे.

जेफरीजच्या दाव्यानुसार, येत्या काही दिवसांत अमेरिकेत सोन्याची किंमत ६६०० अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या सुरु असलेला बुल रन असाच सुरु राहिला तर सोन्याचे दर आणखी वाढतील, असं त्यांनी म्हटलं आहे. भूतकाळातील सोन्याचे दर वाढण्याच्या ट्रेण्डवरून त्यांनी हा अंदाज बांधला असल्याचं त्यांच्या अहवालात म्हटलं आहे.

Gold Rate Today : सोन्याच्या भावात पुन्हा अचानक वाढ; नवा उच्चांक गाठणार ? खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचा ताजा भाव

पुढे त्यांनी सांगितलं की जानेवारी 1980 मध्ये सोन्याच्या सर्वाधिक होते. तेव्हा अमेरिकेचे दरडोई उत्पन्न 9.9 टक्क्यांपर्यंत पोहोचलं होतं. म्हणजेच त्यावेळी अमेरिकेचे दरडोई उत्पन्न 8,551 अमेरिकन डॉलर्स इतकं होते, पण सोन्याची किंमत प्रति औंस 850 अमेरिकन डॉलर्स इतकी होती. आज अमेरिकेत दरडोई उत्पन्न ५.६ टक्के म्हणजेच 66100 अमेरिकी डॉलर इतकं आहे. तर सोन्याची किंमत 3,670 डॉलर प्रति औंस इतकी आहे.

अशावेळी, जर अमेरिकेतील दरडोई उत्पन्न ९,९ टक्क्यांपर्यंत पोहोचवायचं असेल तर सोन्याचे दर ६६०० पर्यंत जाणे आवश्क आहे. सध्या अमेरिकेत सोन्याचे दर ३६७० डॉलर इतके आहे. म्हणजे सोन्याचे दर ६६०० डॉलर पर्यंत पोहोचल्यास सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होणार आहे.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव भारतात आजचे सोन्याचे दर काय?

भारतात आज २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख १२ हजार ७४० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४३ हजार ३७६ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. याशिवाय १८ कॅरेट सोन्याचं दर ८४ हजार ११० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.