सोनई : शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) येथे गुरुवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार पावसाने वाहनतळ, मंदिर परिसर व गावातील सखल भागात पाण्याचे तळे साचले. भुयारी दर्शनपथ मार्गात पानसनाला नदीचे पाणी शिरल्याने पाच तास मार्गावरील दर्शन व्यवस्था बंद करावी लागली होती.
गुरुवारी (ता.१८) च्या मध्यरात्री एक वाजता विजेच्या कडकडाटासह सुरू झालेला जोरदार पाऊस सलग तीन तास सुरू होता. त्यानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत हलका पाऊस सुरू होता. सकाळी पानसनाल्यास पूर येऊन स्मशानभूमी व गावडे महाराज मठाच्या परिसरात पाण्याचे तळे साचले होते.
Kaas Pathar Satara : चक्क नो पार्किंगमध्येच 'पोलिस टोपी'चा रुबाब; कायद्याचे रक्षकच ठरले नियमभंग करणारे, कास पठारावरील प्रकारशनैश्वर देवस्थानच्या वाहनतळास तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. येथील पूजा साहित्य व खेळणीविक्रेत्यांच्या दुकानात पाणी आल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. शनैश्वर देवस्थान प्रशासनाने तातडीने भुयारी दर्शनपथ मार्ग, पूल व मंदिर परिसरातील पाणी काढून मार्ग मोकळा केला.
मुख्य दर्शनपथात पाणी साचल्याने भाविकांसाठी गावकरी द्वार खुले करण्यात आले होते. गावाच्या जवळ असलेल्या शेतात, तसेच रस्त्यावर पाणी साचल्याने शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज शुक्रवारी दुपारनंतर पूर्वीप्रमाणे दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली.