बिटाचा रस पिताय? 'या' लोकांसाठी ठरू शकतो धोकादायक!
esakal September 21, 2025 01:45 AM

Avoid Drinking Beetroot Juice

आरोग्यदायी रस

बीटरूटचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तो चेहऱ्यावर चमक आणतो, रक्ताभिसरण सुधारतो आणि हृदयाचे आरोग्य देखील उत्तम ठेवतो.

Avoid Drinking Beetroot Juice

पण... सावध रहा!

बीटचा रस शरीरासाठी फायदेशीर असला तरी, तो काही लोकांसाठी फायद्यापेक्षा जास्त नुकसान करू शकतो.

Avoid Drinking Beetroot Juice

किडनीचा त्रास असेल तर...

बीटमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. जर तुम्हाला किडनीचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तो पिऊ नका.

Avoid Drinking Beetroot Juice

कमी रक्तदाबाचा धोका

बीटचा रस रक्तदाब कमी करू शकतो. जर तुम्ही कमी रक्तदाबाचे रुग्ण असाल किंवा रक्तदाबाची औषधे घेत असाल, तर बीटचा रस सावधगिरीने प्या.

Avoid Drinking Beetroot Juice

मधुमेहाच्या रुग्णांसाठी

बीटमध्ये नैसर्गिक साखर असते. त्यामुळे, मधुमेहाच्या रुग्णांनी किंवा ज्यांना साखरेची पातळी नियंत्रित ठेवायची आहे, त्यांनी कमी प्रमाणात बीटचा रस प्यावा.

Avoid Drinking Beetroot Juice

लघवीचा रंग बदलेल

बीटचा रस प्यायल्यानंतर लघवीचा रंग बदलू शकतो. हा कोणताही धोकादायक परिणाम नाही, तरीही त्रास वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Avoid Drinking Beetroot Juice

डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

बीटचा रस आरोग्यदायी असला तरी, कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्यांनी तो पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्याचे फायदे जास्त आहेत.

Foods to Boost Your Hemoglobin Naturally

हिमोग्लोबिन कमी आहे? रोजच्या आहारात 'हे' 7 पदार्थ घ्या! येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.