अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा धारकांना मोठा झटका दिला आहे. त्यांनी या व्हिसाच्या नियमात बदल केला असून H-1B व्हिसा मिळवण्यासाठी आता तब्बल 88 लाख रूपये शुक्ल भरावे लागणार आहे. मात्र, ज्या व्यक्तीकडे 88 लाख रूपये आहेत, जो व्यक्ती अमेरिकेत काम करण्यासाठी कशाला जाईल. शिवाय ज्या टेक कंपन्या आहेत, त्या देखील इतर देशातील कर्मचाऱ्यांना अमेरिकेत बोलवण्या अगोदर शंभर वेळा विचार करतील. कारण इतकी मोठी रक्कम संबंध कर्मचाऱ्याला किंवा त्या कंपनीला भरावी लागणार आहे. जे H-1B व्हिसा धारक अगोदरच अमेरिकेत आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचे हे नवीन शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, H-1B व्हिसासाठी आता ते लोक अर्ज करत आहेत, त्यांना हे 88 लाख रूपये शुल्क भरावे लागणार आहे. त्याशिवाय त्यांना हा व्हिसा मिळणार नाहीये.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज एलोन मस्क यांनी H-1B व्हिसाच्या वादावर मोठे विधान केले होते. मस्कने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, तुम्ही कल्पनाही करू शकत नाही अशा प्रकारे मी या मुद्द्यावर युद्ध सुरू करेन…त्यांनी अगदी स्वत:चे स्पष्ट मत मांडत म्हटले की, H-1B व्हिसा केवळ कंपन्यांसाठीच नाही तर अमेरिकेच्या तंत्रज्ञान उद्योगासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. मुळात म्हणजे मी आज अमेरिकेत याच कारणामुळे आहे आणि माझ्यासारखे इतरही बरेच लोक.
स्पेसएक्स, टेस्ला आणि शेकडो कंपन्या निर्माण करून अमेरिकेला बळकटी देण्याचे काम H-1B व्हिसा धारकांनी केले आहे. मस्कने त्यावेळी म्हटले होते की, एक मोठे पाऊल मागे घ्या. मी या मुद्द्यावर असे युद्ध सुरू करेन ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, एलोन मस्क यांनी त्यावेळी हा इशारा डोनाल्ड ट्रम्प सरकारलाच दिला होता. हेच नाही तर H-1B व्हिसाचे मोठे समर्थक हे मस्क आहेत. H-1B व्हिसामुळेच अमेरिकेची प्रगती झाल्याचा दावा ते सातत्याने करताना दिसतात.
H-1B व्हिसाच्या नियमात डोनाल्ड ट्रम्प ज्यांनी जे बदल केले, त्यानंतर अमेरिकेतील अनेक टेक कंपन्या कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला H-1B व्हिसाचा निर्णय धक्कादायक आणि अन्यायकारक असल्याचे अनेकांचे मत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिसाच्या निर्णयाची लवकरच हवा निघेल, असेही अनेकांनी म्हटले आहे. आता या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क एकमेकांपुढे येण्याची दाट शक्यता आहे.