Leopard Attack: 'बेलापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू'; तरुणाचा अर्धवट खाल्लेला मृतदेह, नेमकं काय घडलं..
esakal September 22, 2025 11:45 PM

ओतूर : बेलापूर (ता. अकोले, जि. अहिल्यानगर) गावच्या हद्दीत बिबट्याने तरुणाचा अर्धवट खाल्लेला मृतदेह भिसे वस्ती जवळ डांबरी रस्ताच्या कडेला रविवारी (ता. २१) सकाळी आढळून आला.

Success Story:'विशाल केंजळेंची एमपीएससीमधून यशाला गवसणी'; जिद्दीच्या जाेरावर ११ वेळा सरळसेवा परीक्षेत सुयश, आई-वडिलांचे स्वप्न केलं पूर्ण

पप्पू बाळू दुधवडे (वय २२, रा. ब्राह्मणदरा, म्हसवंडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पप्पू दुधवडे हा शेतमजुरीचे काम करत असून शनिवारी रात्री कामावरून परत असताना दुचाकीचे पेट्रोल संपल्यामुळे तो रात्री पायी घरी येत होता. सकाळी याच मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत दिसून आला.

त्यांनतर स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती अकोले व संगमनेर वनविभागाला कळवली. जुन्नर तालुक्यातील खामुंडी ते बदगी बेलापूर मार्गावर बदगी घाटात शुक्रवारी ओतूर वनविभागाला १५ दिवस वयाची चार बछडी कागदी बॉक्समध्ये ठेवलेली आढळून आली होती. त्यावेळी वनविभागाकडून या बछड्यासाठी बिबट मादी चवताळून परिसरात धुमाकूळ घालू शकते, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले होते.

Mpsc Success Story: 'एमपीएससी परीक्षेत अमृता ननवरे मुलींमध्ये राज्यात प्रथम'; जिद्द अन् चिकाटीच्या जाेरावर यशाला गवसणी

त्यांनतर दोनच दिवसांत येथून जवळील म्हसवंडीचा युवक अकोले तालुक्यातील बेलापूर गावच्या हद्दीत ठार होतो हा एक योगायोग असला तरी तालुक्याच्या हद्दीत मानवाला आहेत. बिबट्या सारख्या वन्यप्राण्यांना नाही. तसेच खामुंडी, बदगी घाट, बेलापूर, म्हसवंडी ही या परिसरातील जवळपास असलेली गावे आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.