swt2322.jpg
93615
मनिषा म्हापणकर
मनिषा म्हापणकर यांचे निधन
म्हापण, ता. २३ः म्हापण सातेरी मंदिर नजीक राहणाऱ्या मनिषा मोहन म्हापणकर (वय ७५) यांचे सोमवारी (ता. २२) राहत्या घरी निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सून, नातू, पुतणे असा परिवार आहे. सेवा निवृत्त शिक्षक मोहन म्हापणकर यांची ती पत्नी, मनोज म्हापणकर, जगदीश म्हापणकर यांची ती आई होत.