- rat२३p६.jpg-
25N93596
रत्नागिरी ः पुरस्कार स्वीकारताना विजय मोर्ये पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात विजेता मोर्ये.
विजेता, विजय मोर्ये यांना पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः सामाजिक कार्यकर्ती विजेता मोर्ये यांना मॉडेलिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच आदर्श युवा पदवीधारक सामाजिक कार्यकर्ती (MSW) म्हणून केलेल्या सामाजिक कार्याबद्दल खासगी संस्थेने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
पुरस्कार वितरण अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याच सोहळ्यात मोर्ये यांचे पती लांजा तालुक्यातील कोलधे, कुंभारगाव येतील विजय मोर्ये यांनाही सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन आदर्श युवा सामाजिक पदवीधारक कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबाबत मोर्ये म्हणाल्या, आयुष्यातील हा पहिला एकत्र पुरस्कार आमच्यासाठी सुवर्णक्षण आहे. हा आमच्या कष्टांचा विजय, आत्मविश्वासाचा मुकुट आणि समाजसेवेच्या व्रताची खरी ओळख आहे. अजून अनेक ध्येयं गाठायची आहेत व समाजासाठी काहीतरी मोठं करायचं आहे. दरम्यान, पुरस्कारासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल रॉयल ग्रुपचे नितीन झगरे यांचे मोर्ये दाम्पत्याने मनःपूर्वक आभार मानले.