शुभम देशमुख
गोंदिया : गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. सकाळी रुग्णालयात ओपीडी सुरू असताच जवळच शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. शॉर्टसर्किट झाल्याने रुग्णालयात तपासणीसाठी आलेले रुग्ण व नागरिकांनी धावपळ सुरु झाली होती. सुदैवाने रुग्णालयातील मोठी दुर्घटना टळली आहे.
गोंदियाशहरात असलेल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात सकाळी हि घटना घडली आहे. महाविद्यालयामधील केटीएस रुग्णालयात ओपीडी सुरू असताना अचानक वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाले. यामुळे आग लागली. यानंतर संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले होते. तर अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गोंधळ उडाला व उपस्थित रुग्ण व नागरिकांमध्ये घबराट पसरून एकच धावपळ सुरु झाली होती.
Heavy Rain : भडगाव, पाचोरा, चाळीसगाव तालुक्यात मुसळधार; घरांसह दुकाने, गुदामात शिरले पाणीमोठी दुर्घटना टळली
संपूर्ण रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले व काही वेळासाठी संपूर्ण रुग्णालयात धूळच धूळ झाली. सुदैवाने आग अधिक पसरली नाही. मात्र वेळेवर अग्निशामकविभागातील कर्मचाऱ्यांनी शॉर्टसर्किटवर आगीवर नियंत्रण मिळाले. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र आगीमुळे रुग्णालयाच्या संपूर्ण परिसरातील इलेक्ट्रॉनिक उपक्रम बंद करण्यात आले.
Pimpri Chinchwad : सराफा दुकानात दरोड्याचा प्रयत्न; रावण टोळीतील आणखी तिघे ताब्यातरुग्णालयात अलार्म अलर्ट नाही
दरम्यान शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय असताना याठिकाणी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीनंतर रुग्णालयात कोणताही अलार्म वाजला नाही. या मुळे लोकांची एकच धावपळ उडाली होती. मुळात एवढा मोठा रुग्णालयात असताना या ठिकाणी अलार्म अलर्ट नसल्यामुळे रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आगीमुळे काही मोठी दुर्घटना घडली असती तर जीवितहानी होण्याची शक्यता देखील होती.