TOMORROW HOROSCOPE : 'या' राशींवर होणार पैशांची बरसात ! 24 सप्टेंबरला महालक्ष्मी राजयोगामुळे बदलणार 3 राशींचं नशीब
esakal September 24, 2025 10:45 PM

Marathi Rashi Bhavishya : ज्योतिष शास्त्रानुसार दररोज ग्रहांच भ्रमण वेगवेगळे योग तयार करत असतो. या शुभ योगांचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. 24 सप्टेंबरला मनाचा कारक असलेला चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तिथे आधीच मंगळ ग्रह उपस्थित आहे. या दोघांची युती होऊन महालक्ष्मी राजयोग तयार होतो आहे.

महालक्ष्मी राजयोगामुळे तीन राशींचं नशीब चमकणार आहे. कोणत्या आहेत या राशी आणि काय बदल घडणार त्यांच्या आयुष्यात जाणून घेऊया.

कर्क रास :

महालक्ष्मी राजयोगामुळे कर्क राशीच्या लोकांचा चांगला काळ सूर झाला आहे. हा राजयोग तुमच्या कुंडलीत भौतिक आणि मालमत्तेचं सुख देणाऱ्या यादीत तयार होतोय. त्यामुळे तुमच्या सुखसोयी आणि ऐशोआरामात वाढ होईल. चांगले लाभ मिळतील. पण तुमच्या लक्ष्यापासून तुम्ही विचलित होऊ नका. जे लोक प्रॉपर्टीसंबंधी काम करतात त्यांना चांगला लाभ होईल. सासू-सासऱ्यांशी तुमचं नातं अधिक मजबूत होईल.

कन्या रास :

कन्या राशीच्या लोकांना हा राजयोग फायदेशीर ठरेल. हा राजयोग धन आणि वाणीच्या ठिकाणी तयार होतो आहे. त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी आर्थिक लाभ होईल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल आणि ज्यामुळे लोक प्रभावित होतील. तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती मनापासून काम करतील. दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या लोकांच्या लग्नाची बोलणी होतील.

कुंभ रास :

महालक्ष्मी राजयोग तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येईल. तुमच्या नवव्या स्थानात हा राजयोग तयार होतोय. त्यामुळे तुमचं नशीब तुम्हाला मदत करेल. लोक धार्मिक कार्यात सहभागी होतील. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळवतील. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. गुंतवणुकीचा फायदा होईल आणि संधीचा फायदा घ्या.

Today Horoscope Prediction : आज मंगळवारी बनतोय गजकेसरी योग, नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या राशींवर होणार कृपा !
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.