निमगाव केतकी, ता. २३ : निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील बापूसाहेब आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल केंद्रात पार पडलेल्या मुलांच्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत ५० खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या ५० पैकी २३ खेळाडू हे इंदापूर तालुक्यातील आहेत.
जिल्हा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे व जनहित पतसंस्था, निमगाव केतकी यांच्या वतीने शुक्रवारी (ता. १९) व शनिवारी (ता. २०) स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेस माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेट दिली. स्पर्धेचे पहिल्या दिवसाचे उद्घाटन सरपंच प्रवीण डोंगरे, मच्छिंद्र चांदणे, किशोर पवार व आयोजक अस्लम मुलाणी यांच्या, तर दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन देवराज जाधव, तात्यासाहेब वडापुरे यांच्या उपस्थितीत झाले. जिल्हा क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र कोळी यांनी स्पर्धेचा जाहीर केला.
वयोगटनिहाय प्रथम क्रमांक विजेते (वजन व तालुका)
१४ वर्ष वयोगट : आदित्य डुबल (३५, मावळ), विपुल निंबाळकर (३८, मुळशी), रणवीर गव्हाणे (४१, दौंड), रुद्रप्रताप साबळे (४४, खेड), वेदांत भांडवलकर (४८, पुरंदर), साई चांदेकर (५२, मावळ), अली पठाण (५७, इंदापूर), शौर्य गोपाळे (६२, मावळ), हर्षल मारकड (६८, इंदापूर), यशराज चोरमले (७५, इंदापूर).
१७ वर्ष वयोगट फ्रीस्टाईल : कौस्तुभ भंडलकर (४५, बारामती), अनिकेत आटोळे (४८, बारामती), रणवीर शिंदे (५१, हवेली), वक्रतुंड फदाले (५५, आंबेगाव), सुजय भोंग (६०, इंदापूर), शौर्य गुरगुडे (६५, इंदापूर), सार्थक मारकड (७१, इंदापूर), यश फरांदे (८०, बारामती), दिव्यांग भागवत (९२, दौंड), जाहीर मुलाणी (११०, इंदापूर).
१९ वर्ष वयोगट फ्रीस्टाईल : अमित हस्पे (५७, इंदापूर), रोहित कोळेकर (६१, इंदापूर), कृष्णकांत जायवड (६५, दौंड), संग्राम दसवकर(७०, वेल्हा), रोहित दंगाणे (७४, इंदापूर), आदित्य कुंभारकर (७९, पुरंदर), सुरज काळे (८६, इंदापूर), जय खर्चे (९२, बारामती), ओम जाधव (९७, इंदापूर), आदित्य जावळे (१२५, भोर).
१७ वर्ष वयोगट ग्रीकोरोमन : वेदांत साळुंखे (४५, भोर), यशराज गडदे (४८, इंदापूर), पृथ्वीराज मारकड (५१, इंदापूर), प्रणव शिंदे (५५, बारामती), श्रवण बोराटे (६०, इंदापूर), हरिदास बर्गे (६५, इंदापूर), माऊली चवरे (७१, इंदापूर), पृथ्वीराज साबळे (८०, खेड), साईराज घोडके (९२, इंदापूर), ओम शिंदे (११०, इंदापूर).
१९ वर्ष वयोगट ग्रीकोरोमन : साई उबाळे (५५, इंदापूर), आदित्य जगताप (६०, दौंड), सार्थक साळुंखे (६३, दौंड), आदित्य भोसले (६७), गणेश मासाळ (७२, इंदापूर), ओम दुधाळ (७७, शिरूर), साईराज जाधव (८२, बारामती), अथर्व भोसले (८७, इंदापूर), संस्कार येलभर (९७ , शिरूर), यशराज जाधव (११०, इंदापूर).