Heart Disease in Youth: हृदयाकडे युवकांचे दुर्लक्ष; वेळेत तपासणी अन् उपचाराचा डॉक्टरांचा सल्ला
esakal September 25, 2025 04:45 AM

छातीत दुखणे,दम लागणे किंवा घडधडणे अशी लक्षणे दिसूनही अनेक तरुण वेळेत वैद्यकीय सल्ला घेत नाहीत. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि गंभीर हृदयरोगाचा धोका वाढतो. त्यामुळे कोणताही त्रास होत असल्यास डॉक्टरांनी तपासणी करून व उपचार घेण्याचा दिला सल्ला आहे.

हृदयाकडे दुर्लक्षामुळे गंभीर आजाराचे उशिरा निदान होते. त्यांनी कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, रक्तातील साखर आणि ईसीजी यांसारख्या तपासण्या नियमित सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. करण्याचा ग्लेनईगल्स रुग्णालयातील मुख्य सीव्हीटीएस सर्जन डॉ. स्वरूप स्वराज पाल म्हणतात की, आरोग्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन युवकांकडे आहे. त्यामुळे हृदयविकाराचा त्रास होणे किंवा हृदयविकाराचा झटका येणे म्हणजे हे वयोवृद्ध लोकांनाचा फक्त होते असे वाटत असल्यामुळेच हृदयाच्या समस्या वाढत आहेत.

Spinal Health Alert: हातातील अशक्तपणा किंवा सुन्नपणा दुर्लक्षित करू नका! असू शकतात पाठीच्या कण्यातील आजाराचे गंभीर संकेत असामान्य लक्षणे

तज्ज्ञांच्या मते, संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान व मद्यपान टाळणे, तणावाचे व्यवस्थापन आणि पुरेशी झोप या जीवनशैलीतील सुधारणा अत्यावश्यक आहेत. कोणतीही असामान्य लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण वेळेत उपचार झाल्यास जीवघेण्या गुंतागुंती टाळता येतात.

सुमारे ५० टक्के तरुण हृदयाबाबत जागरूक नसतात. २७ ते ४५ वयोगटातील १० पैकी पाच रुग्णांना छातीत दुखणे, थडथडणे किंवा असामान्य थकवा जाणवतो. पण ते किरकोळ मानून त्याकडे दुर्लक्ष करतात.

- डॉ. बिपीनचंद्र भामरे, सर्जन

Explained: CAD म्हणजे काय? जाणून घ्या हृदयशस्त्रक्रियेबाबतचे ७ मोठे गैरसमज आणि सत्य

हृदय आरोग्याकडे ४० टक्के तरुण लक्ष देत नाहीत. अनेकांना वाटते की हृदयविकार केवळ वृद्धांना होतात. पण ताण, चुकीचा आहार, धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुणांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

- डॉ. स्वरूप पाल, सर्जन

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.