बी. जे. मेडिकलचे प्रख्यात डॉक्टर डी. बी. कदम यांचे निधन.
नोबल रुग्णालयात दीर्घ आजाराने ६९ व्या वर्षी प्राणज्योत मालवली.
डॉ. कदम हे कोविड व स्वाइन फ्लू टास्क फोर्समध्ये योगदान दिलेले अनुभवी तज्ज्ञ होते.
डॉ. कदम यांच्या निधनाने वैद्यकीय समाज, विद्यार्थी व रुग्णांमध्ये शोककळा पसरली आहे.
वैद्यकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करणारी दुःखद घटना घडली आहे. बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रख्यात डॉक्टर आणि माजी वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. डीबी कदम यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्र, सहकारी, विद्यार्थी आणि रुग्णांमध्ये तीव्र शोककळा पसरली आहे.
डॉ. डीबी कदम हे १९७४ मध्ये बी.जे. मध्ये वैद्यकीय प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी एमबीबीएस आणि एमडी केले. १९८३ ते २०१७ पर्यंत ते औषधशास्त्रात प्राध्यापक होते आणि संस्थेत विविध भूमिका बजावल्या. ते एक हुशार चिकित्सक, शिक्षणतज्ज्ञ आणि प्रशासक होते. डॉक्टर कदम यांना प्लॅटिनम ज्युबिली एपिकॉन आग्रा २०२० येथे सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता.
Shocking : प्रेयसीला पाहायला पाहुणे आले, बॉयफ्रेंडची सटकली, असं काही केलं की...डॉ. कदम यांनी निवृत्तीनंतर काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटलचे माजी डीन म्हणून काम केले. तसेच कदम यांनी A(H1N1) (स्वाइन फ्लू) आणि कोविड-19 या दोन्ही साथीच्या काळात मार्गदर्शक तत्त्वे तयार करणाऱ्या अनेक राज्यस्तरीय टास्क फोर्स गटांमध्ये दोनदा काम केले आहे. असंसर्गजन्य आजारांना कसे रोखायचे आणि नियंत्रित कसे करायचे यावरील राज्य तांत्रिक समित्यांमधील प्रमुख सदस्यांपैकी डॉ. कदम एक होते.
Rudrayani Fort News : संसाराची तूच जननी...! प्रभू श्रीरामांनी 'या' देवीचं दर्शन दोनदा घेतलं, काय आहे आख्यायिका? जाणून घ्यादरम्यान काल डॉ. डीबी कदम यांचे नोबल रुग्णालयात दीर्घ आजाराने वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे. डॉ. कदम यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कदम कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.