Throat Burning Remedies: घशात सतत जळजळ होते का? मग घरच्या घरी करा हे सोपे उपाय!
esakal September 25, 2025 07:45 AM

थोडक्यात:

  • पावसाळ्यात घशातील जळजळ, सर्दी-खोकल्यामुळे त्रास होत असल्यास घरच्या घरी सोपे उपाय करून आराम मिळवू शकतो.

  • गरम पाणी-मीठाने गुळण्या, आद्रक-हळदीचा काढा आणि तुळशीचा काढा यामुळे घशातील जळजळ कमी होते.

  • पुरेसा आराम घेणे आणि पौष्टिक आहार घेणे पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

  • Home Remedies For Throat Burning: राज्यात विविध भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसामुळे वातावरणातील ओलावा आणि थंडी वाढल्यामुळे अनेक जण आजारी पडत आहेत.

    सर्दी, खोकला, ताप यामुळे अनेकांना घशात जळजळ होणे हे जरी सामान्य वाटले तरी हा आरोग्यासाठी घातक आहे.

    OpenAI India Plan: OpenAI कडून मोठा धमाका! 399 चा स्वस्त प्लॅन ठरला सुपरहिट, कसं ते वाचा एका क्लिकवर

    अशावेळी योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर हा लहान आजारही मोठा त्रासदायक ठरू शकतो. जर तुम्हालाही सर्दी, ताप किंवा घशात जळजळ जाणवत असेल, तर घाबरून न जात घरच्या घरी तुम्ही सोपे आणि उपयुक्त उपाय करू शकता.

    हे उपाय करा घरच्या घरी गरम पाणी आणि मीठ

    सकाळी कोमट पाण्यात थोडं मीठ घालून गुळण्या करा. यामुळे तुमचे घशातील जळजळ कमी होते आणि संसर्ग टळतो

    आद्रकचा काढा

    बारीक आद्रकचा रस तयार करा. त्यात थोडं हळद, मध मिसळा आणि २ चमचे रात्री झोपता प्या याने तुमच्या घशातील जळजळ कमी होते.

    H-1B Visa Rules: अमेरिकेत राहून गुगल मध्ये नोकरी करणारे किती भारतीय? H1B व्हिसा नियम बदलल्यानंतर त्यांच्या नोकरीवर काय परिणाम होणार अद्रक इलायचीचा चहा प्या

    जर तुम्ही सतत चहा पित्त असला तर अद्रक आणि इलायची टाकलेला चहा प्या याने तुम्हाला अरं मिळेल.

    तुळशीचा काढा

    तुळशीची पाने उकळत्या पाण्यात टाकून त्याचा काढा तयार करा आणि मध घालून प्यायल्याने सर्दी-खोकल्याला आराम मिळतो.

    पुरेसा आराम आणि पोषण

    पावसाळ्यात शरीराला विश्रांतीची गरज असते. त्यामुळे झोप पूर्ण करा आणि ताजी फळ, पौष्टिक आहार घ्या.

    FAQs

    1. घशातील जळजळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय कोणते आहेत? (What are the home remedies to reduce throat burning?)

    गरम पाणी-मीठाने गुळण्या करणे, आद्रक-हळदी-मधाचा काढा प्यायला आणि तुळशीचा काढा घेणे फायदेशीर ठरते.

    2. पावसाळ्यात घशातील त्रास का वाढतो? (Why does throat irritation increase during monsoon?)

    पावसाळ्यात वातावरणातील ओलावा आणि थंडीमुळे सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो, ज्यामुळे घशात जळजळ होते.

    3. पावसाळ्यात आरोग्य कसे सांभाळावे? (How to maintain health during monsoon?)

    पुरेशी झोप घेणे, ताजा आणि पौष्टिक आहार घेणे, तसेच नियमित घरगुती उपाय करणे गरजेचे आहे.

    4. घशातील जळजळ असताना कोणते पेय उपयुक्त आहेत? (Which drinks are beneficial during throat burning?)

    आद्रक-इलायचीचा चहा, तुळशीचा काढा आणि गरम पाणी-मीठाचे गुळणे घशाला आराम देतात.

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.