ओम शांती, शांती ओम; सर्वात मोठ्या मुस्लिम देशाच्या राष्ट्रपतींनी भाषणाचा 'असा' केला समारोप; पाहा VIDEO
esakal September 25, 2025 07:45 AM

संयुक्त राष्ट्रात इस्लायल पॅलेस्टाइन यांच्यातील युद्धावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी सदस्य राष्ट्रांची बैठक झाली. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत अनेकांनी पॅलेस्टाइनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली. यावेळी जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम राष्ट्राचे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी दिलेलं भाषण सध्या चर्चेत आहे. भाषणाचा समारोप करताना त्यांनी अनेक धर्मांच्या अभिवादनाचा उल्लेख केला. हिंदू धर्मातील ओम शांती, शांती ओम म्हणत त्यांनी भाषण सांपवलं.

संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या ८०व्या अधिवेशनात बोलताना प्रबोवो सुबियांतो यांनी जागतिक शांतता, न्याय आणि समान संधी यावर भर दिला. भीती, वंशवाद, द्वेष, छळ आणि वर्णभेदापासून प्रेरीत असलेल्या मानवी मुर्खपणामुळे आपलं भविष्य धोक्यात जात असल्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रबोवो यांनी जवळपास २० मिनिटं भाषण केलं. त्या भाषणाचा समारोप ओम शांती, शांती ओम याने केला. यातून जागतिक शांततेचं आवाहन त्यांनी केलं.

तुमच्यामुळे मला अडवलंय, फ्रान्सच्या राष्ट्रपतींचा ट्रम्पना फोन; तरीही ३० मिनिटे चालत जावं लागलं

राष्ट्रपती सुबियांतो यांनी बुधवारी घोषणा केली की, इंडोनेशिया शांततेसाठी २० हजार किंवा त्यापेक्षा जास्त सैनिक गाझा किंवा पॅलेस्टाइनमधील क्षेत्रात तैनात करण्यासाठी तयार आहे. इंडोनेशिया आज संयुक्त राष्ट्रात शांतता सुरक्षा दलात सर्वात मोठं योगदान देणाऱ्या देशांपैकी एक आहे. आम्ही फक्त बोलत नाही तर प्रत्यक्षात काम करण्यासह शांतता अबाधित रहावी यासाठी कार्यरत राहू.

दोन राष्ट्रांच्या तोडग्याला इंडोनेशियाने पाठिंबा दिला. पॅलेस्टाइन आणि इस्रायल दोन्ही स्वतंत्र आणि सुरक्षित व्हावेत. दहशतवादाच्या धोक्यापासून ते मुक्त व्हायला हवेत. गाझात विध्वंसक स्थितीवर चिंता व्यक्त करताना त्यांनी निर्दोष लोक मदत मागतायत त्यांना हात द्यायला हवा असं म्हटलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.