एका चेंडूत 286 धावा, विश्व क्रिकेटमध्ये अविश्वसनीय घटना! जाणून घ्या सविस्तर
Marathi October 14, 2025 01:25 AM

भारत आणि वेस्टइंडीज (IND vs WI) यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताचा विजय जवळपास निश्चित दिसत आहे. भारताला जिंकण्यासाठी 121 धावांची गरज होती. चौथ्या दिवसअखेर भारताने 1 खेळाडूच्या मोबदल्यात 63 धावा केल्या होत्या, त्यामुळे अखेरच्या दिवशी फक्त 58 धावा हव्या आहेत. वेस्टइंडीजला विजय अशक्यच वाटत आहे.

याच वेळी पुन्हा एकदा चर्चेत आलेली एक अनोखी घटना म्हणजे एका चेंडूत 286 धावा झाल्याची!

15 जानेवारी 1894 रोजी लंडनच्या ‘पाल-माल गॅझेट’ या वृत्तपत्रात या घटनेची माहिती प्रसिद्ध झाली होती. ऑस्ट्रेलियातील बर्नबरी मैदानावर व्हिक्टोरिया विरुद्ध स्क्रॅच XI या सामन्यात हा प्रकार घडला होता.

सामन्यात व्हिक्टोरियाचा फलंदाज जोरात फटका मारतो आणि चेंडू सीमारेषेआत असलेल्या झाडावर जाऊन अडकतो. चेंडू स्पष्टपणे दिसत असल्याने अंपायरने “लॉस्ट बॉल” मान्य केला नाही. तोपर्यंत दोन्ही फलंदाज सतत धावा काढत राहिले. झाडावरून चेंडू खाली आणण्यासाठी कुऱ्हाड मागवली, शेवटी बंदूक वापरून गोळी झाडून चेंडू खाली पाडला.

तोपर्यंत फलंदाज 286 धावा धावत पूर्ण करतो. म्हणे त्यांनी जवळपास 6 किलोमीटर धाव घेतली होती. ही घटना आजही क्रिकेट इतिहासातील अविश्वसनीय किस्सा म्हणून सांगितली जाते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.