फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांचे यश
फोंडाघाट, ता. १३ : क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे कणकवली तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा कासार्डे माध्यमिक विद्यालयात झाली. यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
यामध्ये १७ वर्षांखालील (मुली) आर्या उमेश शिरवलकर (शंभर मी. धावणे-द्वितीय), श्रावणी दीपक भालेकर (उंच उडी-द्वितीय), अर्पिता गुरुनाथ राणे
(गोळाफेक-द्वितीय), १९ वर्षांखालील मुले- शुभम चंद्रकांत तेली (भालाफेक-प्रथम), दर्शन दशरथ बर्गे (१५०० मी धावणे-द्वितीय) यांनी यश पटकावले. या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षक ए.व्ही.पोफळे यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश सावंत, सेक्रेटरी चंद्रकांत लिंग्रस, खजिनदार वि.रा.तायशेटे, शाळा समिती चेअरमन द.दि.पवार आणि संचालक संचालक मंडळ तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद कृष्णा पारकर, पर्यवेक्षक वि.पां.राठोड आदींनी अभिनंदन केले.