ईपीएफओ पीएफ पैसे काढण्याची मर्यादा: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे आहे. कारण आता पीएफ खात्यातून 100 टक्के रक्कम काढता येणार आहे. दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय. पीएफ काढण्यासाठी आधी 13 वेगवेगळे नियम होते, आता ते नियम सोपे करून 3 प्रकारात विभागले गेलेत. आता शंभर टक्के रक्कम कशासाठी काढता येणार? जाणून घ्या…
आवश्यक गरजा (शिक्षण, विवाह, वैद्यकीय कारणे), गृहसंबंधी गरजा आणि विशेष परिस्थिती अशा तीन कारणांसाठी तुम्ही पीएफ खात्यातून शंभर टक्के पैसे काढू शकता. शिक्षणासाठी दहा वेळा व लग्नासाठी पाच वेळा रक्कम काढता येईल. हे दावे लगेच मंजूर केले जातील.
ईपीएफओने आगाऊ रक्कम काढण्याच्या मुदतीतही बदल केले आहेत. भविष्य निधीच्या परिपक्वतेपूर्वी रक्कम काढण्याची मुदत 2 महिन्यांवरून 12 महिने, तर अंतिम पेन्शन काढण्याची मुदत 2 महिन्यांवरून 36 महिने इतकी वाढवण्यात आली आहे. या नव्या सुधारणांमुळे सदस्यांना निवृत्ती निधी अथवा पेन्शन हक्कांमध्ये कोणतीही तडजोड न करता तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत होईल. सध्या EPFO कडून सदस्यांना 8.25 टक्के व्याजदर दिला जातो. लवकरच आता EPFO चे एटीएम आणि युपीआयने देखील काढता येणार आहे.
ऑनलाइन पैसे काढण्यासाठी, तुमचा UAN सक्रिय असणे आणि तुमच्याकडे आधार-सत्यापित KYC असणे आवश्यक आहे.
1. जर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासायची असेल तर सर्वात सोपा मार्ग ईपीएफओची वेबसाईट https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/login यावर लॉगीन करुन शिल्लक तपासू शकता.
2. खातेधारक त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरुन टोल-फ्री नंबर 9966044425 वर फोन करून देखील शिल्लक रक्कम तपासू शकता.
3. यासोबत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरुन EPFO च्या 7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN हा मेसेज लिहून पाठवावा लागेल. यानंतर पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम समजेल.
EPFO : मोठी बातमी! पीएफ मधून आता 100 टक्के रक्कम काढता येणार, नव्या नियमाने अडचणी दूर
आणखी वाचा