भिगवण, ता. १५ : महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या पुणे जिल्हा युवक जिल्हाध्यक्षपदी मदनवाडी (ता. इंदापूर) येथील नीलेश गायकवाड यांची तर तालुका अध्यक्षपदी गणेश राक्षे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाची कार्यकारिणी निवडीसाठीची बैठक नुकतीच श्रीक्षेत्र ओझर येथे पार पडली.
याप्रसंगी तालुका महिला अध्यक्षपदी पल्लवी भोसले, शहर युवक अध्यक्षपदी गणेश भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन गायकवाड आदींची नियुक्ती करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खंडेराव कडलक, उपाध्यक्ष संतोष भालेकर, नामदेव वाघमारे, विकास अभंग, नवनाथ कदम, मनोज राक्षे आदी उपस्थित होते.