लासलगाव: पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्याच्या सतर्कतेमुळे व सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे दोन अनाथ मुलींचे जीवन वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकण्यापासून वाचले. पोलिस निरीक्षक तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही मुलींना सुरक्षित ठेवत येवला तालुक्यातील सैंगऋषी अनाथ वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले.
अनाथाश्रमाचे नवनाथ जऱ्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलींची आई त्यांना जबरदस्तीने भीक मागायला लावत असे आणि मिळालेल्या पैशातून दारू पिऊन व इतर वाईट कृत्ये करत असे.
मुली भीक मागण्यास नकार देताच त्यांना मारहाण व अमानवी वागणूक मिळत होती. हा प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांनी दक्षता घेत त्वरित कारवाई करून त्या मुलींना आश्रमात दाखल केले.Kolhapur Sex Racket : कोल्हापुरात वेश्या व्यवसाय चालवणारी टोळी गजाआड, अपार्टमेंटमध्ये पोलिसांनी छापा टाकताच...
Kolhapur Sex Racket : कोल्हापुरात वेश्या व्यवसाय चालवणारी टोळी गजाआड, अपार्टमेंटमध्ये पोलिसांनी छापा टाकताच...जऱ्हाड यांनी याबाबत निफाड, तसेच येवला तहसील कार्यालयांना भेट दिली असता, दोन्ही ठिकाणचे अधिकारी जबाबदारी टाळत असल्याचे दिसून आले. अखेरीस त्यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. मंत्री भुजबळ यांनी दोन्ही तहसीलदारांना समोरासमोर बोलावून तत्काळ त्या मुलींच्या जन्मनोंदीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.