थोडक्यात:
दिवाळीच्या साफसफाईत अचानक सापडलेल्या काही गोष्टींना वास्तुशास्त्र आणि ज्योतिषानुसार शुभ मानलं जातं.
अचानक पैसे, शंख-कवडी, मोरपिसी किंवा लाल रंगाच्या वस्तू सापडल्यास ते सौभाग्य, समृद्धी आणि सकारात्मकतेचे लक्षण आहे.
या वस्तूंना पूजास्थळी ठेवून योग्य पद्धतीने पूजन केल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते
Auspicious Items During Diwali: दिवाळी सण १७ ऑक्टोबर पासून सुरू होतोय. त्यानिमित्ताने अनेकांच्या घरांत साफसफाईची धडपड सुरू असते. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, आणि वास्तुशास्त्रानुसार, दिवाळीपूर्वी घराची स्वच्छता केल्याने देवी लक्षमी कृपा प्राप्त होते. आणि घरात सर्व सकारात्मक वातावरण निर्माण होतो.
कधी कधी या साफसफाईदरम्यान काही अशा गोष्टी सापडतात ज्या आपण सहजपणे दुर्लक्षित करतो, पण ज्योतिषशास्त्रात त्यांना फारच शुभ मानलं जात. अशा वस्तू देवी लक्ष्मीची विशेष कृपा दर्शवतात. चला तर मग जाणून घेऊया, त्या कोणत्या ४ गोष्टी आहेत ज्या नशीब खुलवणाऱ्या मानल्या जातात.
पैसे सापडणेजर दिवाळीची साफसफाई करताना जुन्या कपाटात, किंवा खिशात अचानक पैसे सापडणे खूप शुभ मानले जाते. हे नुसते पैसे नसून तुमच्या जीवनातील संपत्ती आणि आर्थिक स्थैर्य वाढीचे संकेत आहेत. या पैशांचा योग्य वापर करणे महत्वाचे असते, त्यांना पूजास्थळातठेवून नव्या संधीसाठी प्रार्थना करावी.
शंख आणि कवडी सापडणेसाफसफाई करताना अचानक जर शंख आणि कवडी सापडल्यास ते खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की, हे दोन्ही पदार्थ समुद्र मंथनातून मिळालेले असून त्यांचा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीशी थेट संबंध आहे. त्यामुळे शंख आणि कवडी सापडणं हे समृद्धी, सौभाग्य आणि आर्थिक प्रगतीचं लक्षण आहे. त्यांना गंगाजलाने शुद्ध करून पूजास्थळी ठेवावं आणि दिवाळीच्या रात्री विशेष पूजा करावी.
मोरपिसी मिळणेमोरपिसी हा निसर्गाचा अनमोल देणगा असून त्याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. मोरपिसी मिळणे म्हणजे नकारात्मकतेपासून संरक्षण आणि शांतीची हमी. या मोरपिसीला घराच्या प्रमुख ठिकाणी ठेवणे घरात स्नेह, समाधान आणि समृद्धी वाढवते.
लाल रंगाच्या वस्तूंची उपस्थितीलाल रंग ही ऊर्जा, प्रेम आणि शक्तीची रंगसंगती आहे. दिवाळीच्या साफसफाईदरम्यान जर कोणत्याही वस्त्रात लाल रंगाचे तुकडे सापडले तर ते देवी-देवतांच्या विशेष आशीर्वादाचे चिन्ह मानले जाते. असे लाल वस्त्र दिवाळीच्या पूजा वेळेस वापरल्याने घरात सौभाग्य आणि उन्नतीची भरभराट होते.
FAQs1. दिवाळीच्या साफसफाईदरम्यान अचानक पैसे सापडले तर काय करावे? (What should I do if I find unexpected money during Diwali cleaning?)
हे शुभ मानले जाते. ते पैसे पूजास्थळी ठेवून लक्ष्मी देवीची प्रार्थना करावी आणि योग्य मार्गाने त्यांचा उपयोग करावा.
2. शंख आणि कवडी सापडल्यास त्यांना कसे वापरावे? (How should I use a conch or cowrie shell found during Diwali cleaning?)
शंख आणि कवडी गंगाजलाने शुद्ध करून पूजास्थळी ठेवावेत आणि दिवाळीच्या रात्री विशेष पूजा करावी.
3. मोरपिसी सापडल्यास त्याचे महत्त्व काय आहे? (What is the significance of finding a peacock feather?)
मोरपिसी नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि घरात शांती व सौहार्द निर्माण करते, म्हणून ती घरात प्रमुख ठिकाणी ठेवावी.
4. लाल रंगाचे वस्त्र सापडल्यास काय करावे? (What to do if a red-colored cloth is found during cleaning?)
लाल वस्त्र पूजेसाठी वापरावे, कारण ते देवीचा आशीर्वाद दर्शवते आणि घरात सौभाग्य व उन्नती वाढवते.