कऱ्हाड : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर होते. यावेळी जिल्हा परिषेदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंत ऊर्फ बंडानाना जगताप, कालेतील पैलवान नाना पाटील, शिवाजीराव मोहिते या कऱ्हाड दक्षिणेतील काँग्रेसच्या तीन स्थानिक नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली. यासाठी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक राजेंद्र यादव, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या मध्यस्थीने ही बैठक झाली. येत्या काही दिवसांत त्यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे.
MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात!निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने कऱ्हाड शहरातील शिवसेना शिंदे गटाच्या एका माजी नगरसेविकेसह अन्य तीन नगरसेवकांचा मुंबईत प्रवेश करून घेतला. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर सक्रिय होते. त्यात तालुक्यातील तीन नेत्यांची उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यात जिल्हा परिषेदत विरोधी पक्षनेते जयवंत जगताप यांचा समावेश आहे.
माजी उपनगराध्यक्ष श्री. यादव, महाराष्ट्र केसरी पाटील यांच्या मध्यस्थीने श्री. जगताप यांच्यासह पैलवान पाटील, श्री. मोहिते यांची आज साताऱ्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या तिघांचाही शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. या घडामोडींमुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाला धक्का बसण्याची चर्चा आहे.
शिवसेना पक्षवाढीच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, त्या करत आहोत. पक्ष बळकटीसाठी काही लोकांशी संपर्क साधत आहोत. त्यात तालुक्यातील या तीन नेत्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. श्री. शिंदे यांच्या संघटन कौशल्यामुळे शिवसेना वाढत आहे. त्यामुळे कऱ्हाडसह जिल्ह्यात शिवसेना वाढण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- राजेंद्र यादव जिल्हा समन्वयक, शिवसेना
Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्थ आक्रमक'; खटला जलदगती न्यायालयात चालवा मनोहर शिंदेंसाठीही प्रयत्नजयवंत जगताप यांच्यासह तिघांशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मलकापूरचे माजी उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांची चौकशी केली. त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा संपर्क झाला नाही. काँग्रेसच्या संघटन पटलावर श्री. शिंदे यांचे चांगले काम आहे. त्यामुळे शिवसेना त्यांच्या संपर्कात आहे, असे श्री. शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.