स्वत:साठी खास गिफ्ट! प्रवासाला अधिक विशेष बनवण्यासाठी दैनंदिन वापरातील कोणती वस्तू खरेदी कराल?
esakal October 16, 2025 07:45 PM

Travel Tips : प्रवास हा केवळ ठिकाणे पाहण्याचा नसतो, तर त्या अनुभवांची साथ आपल्याबरोबर घेऊन येण्याचाही असतो. यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुवेनिअर्स किंवा ‘स्मरणिका’. अनेक वेळा काय आणावे, कशावर खर्च करावा याचा गोंधळ होतो. याबाबत काही टिप्स बघूया.

प्रवासाचे ‘स्मरण’ कसे ठेवाल?

का आणावे? : एखाद्या ठिकाणाची चव ही त्या ठिकाणची ओळख पटकन् आपल्या मनात बसवून देते. का आणावे? : ही सर्वांत खास गोष्ट आहे. एखाद्या ठिकाणची संस्कृती, कला आणि कारागीरांचे कौशल्य हस्तकलेतूनच जाणवते. उदाहरणे : राजस्थानमधून ब्लॉक प्रिंटेड कपडे, चकाकते दागिने, दक्षिण भारतातून विशेष मूर्ती, रेशमी साड्या

का आणावे? : हे आपल्या घरात एक डेकोरेटिव्ह तुकडा बनू शकतात किंवा विशेष प्रसंगी परिधान केले जाऊ शकतात. उदाहरणे : नॉर्थ ईस्टमधून एक खास दागिने, केरळमधून ‘कथकली’ मुखवटा.

खाद्यपदार्थ: एक चविष्ट आठवण स्थानिक हस्तकला आणि कला उत्पादने निवडा सांस्कृतिक वस्तू आणि पारंपरिक वेशभूषा

का आणावे? : अशा वस्तू आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनतात आणि प्रवासाची आठवण दररोज करून देतात. उदाहरणे : दार्जिलिंग किंवा असममधून चहा, केरळमधील कॉफी.

दैनंदिन वापरात येणारे आयटम प्रवास फक्त इतरांसाठी सुवेनिअर्सचा नसतो. स्वतःसाठी काहीतरी आणल्याने तो प्रवास आपल्यासाठी अधिक विशेष बनतो. उदाहरणे : एखादा खास दागिना, लिहिण्याची सवय असेल तर एखादे सुंदर पेन, एखादे स्थानिक सुगंधी तेल किंवा परफ्युम.

Travel story : एका अविस्मरणीय प्रवासाची कहाणी! रेल्वे पकडण्यासाठी चपला हातात घेऊन पळाले, पण तरीही… स्वतःसाठी एक खास गोष्ट

मास प्रॉडक्ट्स : ज्या वस्तू आपल्या स्वतःच्या शहरात कोणत्याही सुवेनिअर शॉपवर मिळू शकतात, त्या आणणे टाळा. पर्यावरणास हानीकारक वस्तू. अतिशय नाजूक वस्तू

काय टाळाल?

या गोष्टी लक्षात घ्या वैशिष्ट्य पाहा : तुम्ही जे काही आणत आहात ते त्या ठिकाणचे खास आहे का, याचा विचार करा. उदाहरणार्थ, मुंबईतून चेन्नईचे सुवेनिअर आणण्यात अर्थ नाही. वाहतूक आणि पॅकिंगचा विचार करा : नाजूक वस्तू, द्रव पदार्थ आणण्यास अडचणी असू शकतात. विमान कंपन्यांचे नियम जाणून घ्या.

खरेदी स्थानिक बाजारातून करा : मोठ्या मॉलपेक्षा स्थानिक बाजारातून खरेदी केल्यास कारागिरांना थेट फायदा होतो आणि खरी संस्कृती अनुभवायला मिळते. गुणवत्तेकडे लक्ष द्या : स्वस्त; परंतु निकृष्ट दर्जाच्या अनेक वस्तूंपेक्षा चांगल्या गुणवत्तेची एक वस्तू आणणे चांगले. आकार लक्षात घ्या : मोठ्या आकाराच्या वस्तू घेऊन फिरणे आणि नेणे अवघड असू शकते. कायदेशीर बंधने तपासा : काही देशांतून विशिष्ट वस्तू नेण्यास बंदी असू शकते.

Travel Story : "आई, मी घर सोडून चाललो!" चॉकलेट आणि पोळीचा रोल घेऊन निघालेल्या 4 वर्षांच्या आहानचा गमतीदार प्रवास!
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.