तासगाव: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून चक्काजाम आंदोलन केल्याबद्दल माजी खासदार संजय पाटील यांच्यासह ११ जणांवर तासगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे जलद पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी तासगाव बसस्थानक चौकात मंगळवारी (ता. १४) माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन झाले.
जमावबंदी आदेश असताना आंदोलन केल्याप्रकरणी संजय पाटील, प्रभाकर पाटील, प्रमोद शेंडगे (पेड), आर. डी. पाटील (निमणी), बाबासाहेब पाटील, जाफर मुजावर, हणमंत पाटील (तासगाव), महेश पाटील (कुमठे), कृष्णा पाटील (लिंब), सुदीप खराडे (मांजर्डे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.