'श्री' की 'जान्हवी' सगळ्यात जास्त संपत्ती कोणाकडे? तेजश्री प्रधान की शंशाक केतकर कोण आहे वरचढ?
esakal October 16, 2025 09:45 PM

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती सध्या वीण दोघातली ही तुटेना या मालिकेत स्वानंदीच्या भूमिकेत पहायला मिळतेय. या मालिकेतील तिचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड भावलं. याआधी तेजश्री स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत पहायला मिळाली होती. परंतु तिच्या मालिकेतील अचानक एक्झिटमुळे चाहत्यांना धक्का बसला. प्रेक्षकांनी तेजश्रीच्या प्रत्येक पात्रावर प्रेम केलय. तेजश्रीच्या जान्हवी, शुभ्रा आणि आता स्वानंदीचं पात्र प्रेक्षकांना हवहवसं वाटतं.

तसंच शंशाक केतकरचा सुद्धा मोठा चाहतार्वग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याचं होणार सुन मी या घरची मालिकेतील 'श्री'चं पात्र प्रेक्षकांना प्रचंड भावलं होतं. प्रेक्षकांच्या मनात श्री घर करुन बसला होता. आता सध्या शंशाक मुरांबा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.

शंशाक आणि तेजश्री यांचं होणार सुन मी या घरची मालिकेत जुळलं होतं. दोघांनी लग्न सुद्धा केलं. पंरतु दोन वर्षातच दोघे वेगळे झाले. 2015 त्यांनी घटस्फोट घेतला. आता शंशाक आणि तेजश्री दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. शंशाकने दुसरं लग्न केलय. तर तेजश्री अजूनही सिंगल आहे. तिने तिच्या करिअरकडे लक्ष केंद्रीत केलय.

शंशाक की तेजश्री दोघांपैकी कोणाकडे जास्त संपत्ती आहे?

शंशाक केतकर की तेजश्री प्रधान दोघांपैकी कोणाकडे जास्त संपत्ती आहे. तुम्हाला माहिती आहे का? तर शंशाक केतकर सध्या मुरांबा मालिकेत काम करतो. तसंच तो अनेक मालिकांमध्ये सुद्धा पहायला मिळाला. तसंच शंशाक अनेक कार्यक्रमामध्ये हजेरी सुद्धा लावतो. त्यामुळे शंशाककडे ५ कोटीपर्यंत संपत्ती असण्याची शक्यता आहे.

तर तेजश्री प्रधान सध्या वीण दोघातली ही तुटेना या मालिकेत काम करतेय. तिने अनेक मालिका चित्रपटामध्ये काम केलं आहे. ती अनेक ब्रॅण्डचं शुट करते. तसंच अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी सुद्धा लावते. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार तेजश्री प्रधानकडे १५ ते २० कोटींपर्यंतची संपत्ती आहे. त्यामुळे शंशाकपेक्षा तेजश्री वरचढ आहे.

'दोन कपल्स एकाच बिछाण्यावर...' पंकज धीर यांनी देशात पहिल्यांदा बनवलेला 'अश्लील सिनेमा', हॉटेलच्या बंद रुममध्ये झालेलं शुटिंग
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.