चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर
Marathi October 16, 2025 11:25 PM

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. मात्र, आज चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.  सोन्याच्या दरात आज देखील वाढ सुरु आहे. चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याची माहिती इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर पाहता येतील.

16 ऑक्टोबरला सांयकाळी 5 वाजताच्या आयबीजेएच्या दरानुसार 1 किलोचे चांदीचे दर 168083 रुपये आहेत. आज सकाळी चांदीचा दर 170850 रुपये किलो होता. तर, 15 ऑक्टोबरला चांदीचा 1 किलोचा दर 176467 रुपये होता. म्हणजेच आज सकाळच्या तुलनेत चांदीच्या दरात  2800 रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या दरात 8400 रुपयांची घसरण झाली आहे.

आयबीजेएच्या दरानुसार चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बुलियन मार्केटमध्ये चांदीचा उच्चांकी दर 176467 रुपयांवर पोहोचला होता. सोन्याच्या दरात आज देखील तेजी पाहायला मिळाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा जीएसटीसह एका तोळ्याचा दर 127471 रुपये आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 126961 इतका आहे. 18 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 95603 रुपये आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात तेजी दिसून आली. सायंकाळी  6 वाजता 1700 रुपयांच्या तेजीसह चांदीचा दर 163900 रुपये प्रति किलो आहे. सोन्याचा विचार केला असता  5 डिसेंबरच्या वायद्याच्या सोन्याचा दर 128184 रुपये इतका आहे. सोन्याच्या दरातील तेजी 1000  रुपये इतकी आहे.

शेअर बाजारात सिल्वर ईटीएफमध्ये देखील घसरण पाहायला मिळाली. चांदीचे ईटीएफ 6 ते 10 टक्क्यांनी घसरले. सिल्वरबीस 6.73 टक्के घसरला. एचडीएफसी सिल्वर ईटीएफमध्ये 7 टक्के घसरण झाली. ग्रो सिल्वर ईटीएफमध्ये 10 टक्के घसरण झाली.

स्टॉक मार्केटमध्ये चांदीच्या तुटवड्याची बातमी आल्यानंतर चांदीचे दर घसरले. मुंबईच्या झवेरी बाजारानं चांदीच्या नव्या ऑर्डर स्वीकारणं बंद केल्याचं वृत्त समजल्यानंतर घसरणीनं वेग पकडला. उद्योग जगतात चांदीची मागणी वाढल्यानं आणि गाजकित गुंतवणुकीच्या मागणीमुळं चांगीच्या दरात घसरण झाल्याची बातमी समोर आली आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.