या मुस्लीम देशातून येतोय खोऱ्याने पैसा, का पैसे पाठवण्याची वाढली स्पर्धा, भारतीय अर्थव्यवस्थेला किती फायदा ?
GH News October 20, 2025 11:12 PM

भारतात विदेशातून दरवर्षी येत असतो पैसा. परदेशात राहणारे भारतीय त्यांच्या नातेवाईकांना पैसे पाठवत असतात. आरबीआयच्या अहवालानुसार २०२४-२५ मध्ये परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी १३५ अब्ज डॉलर रेमिटेन्स पाठवले आहेत. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या मुळे IMF आणि जागतिक बँकेने भारताला टॉप रेमिटेन्स रिसिव्हींग नेशनने दर्जा दिलेला आहे. भारतात सर्वात जास्त रेमिटेन्स अमेरिकेतून येतो. या सर्वात एक आकडा आश्चर्यचकीत करणार आहे.

या मुस्लीम देशातून खोऱ्याने येतोय पैसा

भारतात येणाऱ्या रेमिटेन्समध्ये संयुक्त अरब अमिरात (UAE)आणि सौदी अरबचा हिस्सा वाढला आहे. युएई आणि सौदीत अरबमध्ये राहणारे भारतीय मोठ्या प्रमाणात पैसा भारतात पाठवत आहेत. या देशात राहणाऱ्या भारतीयांमध्ये मायदेशात सध्या पैसे पाठवण्याची अहमिका लागली आहे.यामागे खरे कारण काय ? वास्तविक भारतीय रुपयाची किंमत युएई दिरहमच्या तुलनेत घसरुन २३.५ रुपये प्रति दिरहमपर्यंत पोहचली आहे. यामुळे NRI याचा फायदा उचलून जास्तीत जास्त रक्कम भारतात पाठवू इच्छीत आहेत.

गल्फ न्यूजच्या बातमीनुसार रुपया जेव्हापासून घसरुन २३.८ रुपये प्रति दिरहमच्या जवळ पोहचला आहे. तेव्हापासून भारतात पैसे पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ते कमी रुपयात जास्त दिरहम पाठवू शकत आहेत. युएई आणि सौदीत राहाणाऱ्या भारतीयांच्या या पावलाने भारतातील त्यांच्या कुटुंबियांना जास्त पैसे मिळत आहे. एप्रिलच्या सुरुवातीनंतर असे पाहायला मिळाले आहे.

मुस्लिम देशातून मनी ट्रान्सफरच्या वेगामागे कारण काय ?

आखाती देशातील करन्सी एक्स्चेंज हाऊसच्या मते जून २०२५ पासून AED मधून INR मधून देवाण घेवाण वाढली आहे. इंडस्ट्रीजच्या अधिकाऱ्यांच्या मते ज्यांच्या जवळ थोडे बहुत एक्स्ट्रा पैसे आहेत ते तातडीने भारतात पाठवत आहेत. UAE च्या एका एक्स्चेंज हाऊसच्या सिनीयर अधिकाऱ्यांनी गल्फ न्यूजला सांगितले की अलिकडच्या आठवड्यात AED-INR रेमिटेन्सच्या दृष्टीने चांगला दिवस राहिला. सर्वसाधारणपणे जून महिन्यात एनआरआय भारतीय सुट्ट्या आणि ट्रॅव्हल्सच्या खर्चामुळे भारतात कमी पैसे पाठवायचे.परंतू यंदा रुपया घसरल्याने ट्रेंड बदलला आहे.

रेमिटेन्स म्हणजे काय? भारताला काय फायदा?

जेव्हा परदेशात राहणारे भारतीय नागरिक जेव्हा आपल्या कुटुंबाला भारतात पैसे पाठवतो त्याला रेमिटेन्स म्हटले जाते. या रेमिटेन्समुळे भारतीय अर्थव्यवस्थेला ताकद मिळते. यामुळे देशात डॉलर सारख्या परकीय चलनाचा प्रवाह वाढतो. त्यामुळे भारताची परकीय गंगाजळी मजबूत बनते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.