Vastu Tips : दिवाळीच्या दिवशी तुळशी संबंधित करा हे सोपे उपाय, आयुष्यात कधीच धनाची कमी भासणार नाही
Tv9 Marathi October 21, 2025 12:45 AM

दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळीच्या दिवशी सायंकाळच्या वेळी लक्ष्मीपूजन केलं जातं. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहवा यासाठी या दिवशी अनेक प्रकारचे धार्मिक उपाय केले जातात. ज्यामध्ये तुळशी संबंधित देखील काही उपाय आहेत. हिंदू धर्मामध्ये तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तुळशीचं झाडं हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं सर्वात प्रिय झाडं आहे. त्यामुळे ज्या घरात तुळस आहे, आणि तुळशीची दररोज नित्यनियमाने पूजा केली जाते, त्या घरावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो, त्या घरात कधीही आर्थिक तंगी जाणवत नाही, आज आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत, जे दिवाळीच्या दिवशी केल्यास घरावर सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो.

तिजोरीशी संबंधित उपाय – असं मानलं जातं की, तुळशीचे पान किंवा मंजरी एका लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होते. घरात सुख समृद्धी येते. प्रगतीच्या नवीन संधी मिळतात.

दिवा लावा – वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी वाळलेल्या तुळशीच्या छोट्या-छोट्या लाकडांना सुतामध्ये बांधून, तुपात बुडून ठेवा, त्यानंतर त्याचा दिवा लावावा, या उपायामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. घराची भरभराट होते.

होमामध्ये उपयोग – होमामध्ये तुळशीच्या लाकडांचा उपयोग केल्यास घरातील वातावरण प्रसन्न राहतं, घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. ज्याचा परिणाम हा कुटुंबातील प्रत्येक सदस्यांवर होतो.

मुख्य दरवाजावर लावा – वास्तुशास्त्रानुसार सुकलेल्या तुळशीची लाकडं एका लाल कपड्यात बांधून ती जर घराच्या मुख्य दरवाजाला लावली तर घरात येणारी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहतो.

लक्ष्मी मातेला अर्पण करा – दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनावेळी तुळशीची पानं आणि मंजिरी लक्ष्मी मातेला अर्पण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. त्यानंतर लक्ष्मी मातेला अर्पण केलेली ही पानं किंवा मंजिरी एका लाल कपड्यामध्ये बांधून ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा, सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.