श्रीलंकेने आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 21 व्या सामन्यात बांगलादेशच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला आहे. श्रीलंकेने बांगलादेश विजयासाठी 203 धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशने या विजयी धावांचा 49 व्या ओव्हरपर्यंत शानदार पाठलाग केला. त्यामुळे बांगलादेशला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 9 धावांची गरज होती. मात्र कॅप्टन चमारी अटापटू हीने 50 व्या ओव्हरमध्ये यशस्वीरित्या 9 धावांचा बचाव केला. चमारी अट्टापट्टू हीने बांगलादेशला शेवटच्या ओव्हरमधील पहिल्या 4 बॉलमध्ये 4 झटके (तिसऱ्या बॉलवर रन आऊट) दिले. बांगलादेशने पाचव्या बॉलवर 1 धाव घेतली. तर चमारीने सहाव्या चेंडूवर धाव दिली नाही. श्रीलंकेने अशाप्रकारे या स्पर्धेतील पहिलावहिला विजय 7 धावांनी मिळवला. बांगलादेशने अशाप्रकारे हातात असलेला सामना गमावला.
चमारीने पहिल्याच बॉलवर रबिया खान हीला एलबीडब्लयू आऊट केलं. दुसऱ्या बॉलवर नाहिदा अक्टर रन आऊट झाली. त्यानंतर रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेलेली शर्मिन अक्टर मैदानात आली. चमारीने तिसऱ्या बॉलवर बांगलादेशला मोठा झटका दिला. चमारीने कॅप्टन निगर सुल्ताना हीला निलाक्षी डी सिल्वा हीच्या हाती 77 रन्सवर कॅच आऊट केलं. चमारीने चौथ्या बॉलवर मारुफा अक्टरला एलबीडब्ल्यू केलं. श्रीलंकेने अशाप्रकारे शेवटच्या ओव्हरमधील पहिल्या 4 बॉलवर 4 झटके देत सामना आपल्या बाजूने झुकवला.
बांगलादेशने पाचव्या चेंडूवर 1 धाव घेतली. तर चमारीने सहाव्या शेवटच्या बॉलवर एकही धाव दिली नाही. श्रीलंकेने अशाप्रकारे या स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. तर बांगलादेश या पराभवासह स्पर्धेतून बाहेर होणारी पहिली टीम ठरली.
बांगलादेशसाठी कॅप्टन निगल सुल्ताना हीने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली. शर्मिन अक्टर हीने नाबाद 64 धावा केल्या. मात्र त्यानंतरही बांगलादेशच्या उर्वरित फलंदाजांना संघाला विजयी करता आलं नाही. श्रीलंकेसाठी चमारी व्यतिरिक्त सुंगदिका कुमारी हीने 2 विकेट्स मिळवल्या. तर उद्देशिका प्रबोधिनी हीने 1 विकेट मिळवली.
श्रीलंकेचा पहिला विजय
त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र श्रीलंकेला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. बागंलादेशने श्रीलंकेला 48.4 ओव्हरमध्ये 202 रन्सवर ऑलआऊट केलं. श्रीलंकेसाठी हसिनी परेरा हीने सर्वाधिक 85 धावा केल्या. कॅप्टन चमारी अटापटू हीने 46 धावांचं योगदान दिलं. तर निलाक्षी डी सिल्वा हीने 37 रन्स केल्या. या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. बांगलादेशसाठी शोमा अक्टर हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.