आयसीसी वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील 22 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील सहावा सामना असणार आहे. दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत सलग आणि एकूण 4 सामने जिंकले आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीतही प्रवेश मिळवला आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे अजिंक्य विरुद्ध अपयशी असा हा सामना असणार आहे. या सामन्याबाबत आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामना मंगळवारी 21 ऑक्टोबरला होणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांन टॉस होईल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना औपचारिकता आहे. मात्र त्यानंतरही दक्षिण आफ्रिकेचा हा सामना जिंकून विजयी घोडदौड कायम राखण्यासह नेट रनरेट आणि सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेला या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने जोरदार कमबॅक करत विजयी चौकार लगावला. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड, इंडिया, बांगलादेश आणि श्रीलंकेला पराभूत केलं आणि उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. आता दक्षिण आफ्रिकेचा मंगळवारी पाकिस्तानला पराभूत करत विजयी पंच लगावण्याचा प्रयत्न असणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान 5 सामन्यानंतरही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. पाकिस्तानचा पहिल्या 3 सामन्यांमध्ये पराभव झाला. तर पाकिस्तानचा चौथा आणि पाचवा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिला विजय मिळवणार का? याकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.