Hingoli Crime : शुल्लक कारणातून व्यापाऱ्याला दोघांची मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
Saam TV October 21, 2025 08:45 AM

हिंगोली : हिंगोलीत एका क्रेशर मशीन चालवणाऱ्या व्यापाऱ्याला शुल्लक कारणावरून दोन जणांनी पेट्रोल पंपावर बेदम मारहाण केली आहे. लाकडी दांडा, खुर्च्या आणि दगडांच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली असून यात व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. हि संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

हिंगोलीशहरातील एका पेट्रोल पंपावर सदरची घटना घडली आहे. यात काळुराम जाधव असे मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. तर शंकर देवकर व दिगंबर देवकर अशी मारहाण करणाऱ्या दोघांची नावे आहेत. दरम्यान या घटनेत व्यापारी जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सद्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मारहाणनेमकी कोणत्या कारणातून झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.  

Sangli Water Supply : ऐन दिवाळीत सांगली शहरात पाण्याचा ठणठणाट; संतप्त नगरसेवकांनी पाणीपुरवठा कार्यालयासमोर धरणे

गुन्हा दाखल मात्र मारेकरीना अद्याप अटक नाही 

धक्कादायक म्हणजे ही घटना १७ ऑक्टोबरला दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणात बासंबा पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नसल्याने व्यापाऱ्याच्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी आता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे करण्यात आली आहे. 

Ahilyanagar : पाच डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल होऊनही अटक नाही; ठाकरे गट आक्रमक

गाडीला कट मारल्याच्या कारणातून हाणामारी 
बीड : बीड शहरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तरुणांच्या दोन गटात राडा झाला. गाडीला कट लागल्याच्या कारणातून या दोन गटात मारामाऱ्या झाल्या. बराच वेळ हा सगळा प्रकार सुरू होता. यामध्ये एक जण जखमी देखील झाला. यानंतर परिसरातील पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी या ठिकाणी दाखल होत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर पोलीस कर्मचाऱ्या तक्रारीवरून दोन्ही गटातील तरुणांवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.