देशाच्या शेअर बाजारात दशकानंतर पहिल्यांदाच दिवाळीचे मुहूर्त ट्रेडिंग विंडो दुपारी स्लॉट दिसेल. सवंत 2082 च्या सुरुवातीचे प्रतिक म्हणून सालाबादाप्रमाणे मुहूर्त ट्रेडिंग होत आहे. पण मुहूर्त ट्रेडिंगची वेळ संध्याकाळी नसेल तर यंदा ही वेळ बदलली आहे. वेळ बदलल्याची दखल अनेक गुंतवणूकदारांना नाही. किती वेळ चालेल हे व्यापारी सत्र, जाणून घ्या.
दुपारी उघडेल शेअर बाजार
आतापर्यंत शेअर बाजारातील वेळेत कोणताही बदल दिसला नाही. पण यंदा नियमात बदल दिसला आहे. दशकानंतर पहिल्यांदा असे दिसत आहे. शेअर बाजाराचा मुहूर्त ट्रेडिंग यंदा दुपारी होत आहे. मंगळवारी आज नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजचे मुहूर्त ट्रेडिंग दुपारी 1:45 वाजता सुरु होईल आणि ते 2:45 वाजेपर्यंत चालेल. मंगळवारी नवीन हिंदू आर्थिक वर्ष संवत 2082 ची सुरुवात होत आहे.
काय असेल रणनीती?
निफ्टी50 चा 14 दिवसांचा RSI 71.8 च्या खास पातळीवर आहे. तज्ज्ञांच्या मते मुहूर्त ट्रेडिंगवेळी निफ्टीमध्ये तेजीचे सत्र दिसू शकते. तज्ज्ञांच्या मते, निफ्टी 25,900 च्या जवळपास असेल. जियोजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य बाजार तज्ज्ञ आनंद जेम्स यांनी गेल्या एका दशकात 6 मधील 5 वेळा मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी आरएसआय 55 पेक्षा अधिक होता. निफ्टी 50 ने पुढील आठवड्यात सरासरी 1.5 टक्के आणि त्यानंतरच्या महिन्यात जवळपास 4 टक्के वृद्धी नोंदवली. सध्या आरएसआय रीडिंग आणि यापूर्वीचे निकाल पाहाता, जर असेच पॅटर्न कायम राहिले तरे निफ्टी 50 या आठवड्यात 25,900 कडे धाव घेईल आणि अस्थिरता संपेल अशी शक्यता वर्तवली आहे.
या क्षेत्रातील शेअर्स तळपतील
गेल्या एका दशकात निफ्टी 50, मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी 80 टक्के वेळा वाढीसह बंद झाला. यामध्ये सरासरी 0.5 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स या काळात 90 टक्के वेळा वाढला. त्यात क्रमशः 0.7 टक्के आणि 1 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.
मुहूर्त ट्रेडिंगनंतर सरकारी बँकांमध्ये 9 टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसू शकते. तर काही तज्ज्ञांच्या मते 65 टक्क्यांपेक्षा अधिकची तेजी येण्याची शक्यता आहे. तर पुढील महिन्यात त्यात 18 टक्क्यांपेक्षा अधिकची तेजीची शक्यता आहे. मेटल शेअरमध्ये जवळपास तेजी दिसू शकते. मुहूर्त ट्रेडिंगनंतर या सेक्टरमध्ये 4 टक्के तर पुढील महिन्यात 8.5 टक्क्यांची वाढ येऊ शकते.
रिअल्टी शेअरमध्ये मुहूर्त ट्रेडिंगनंतर गेल्यावर्षी घसरणीची शक्यता आहे. पुढील आठवड्यात 5 टक्क्यांपर्यंत घसरण येऊ शकते. फार्मा शेअर्समध्ये पण मोठ्या गडबडीची शक्यता आहे. मुहूर्त ट्रेडिंगनंतर पुढील आठवड्यात जवळपास 3 टक्के आणि पुढील महिन्यात 4 टक्क्यांच्या घसरणीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
गेल्यावर्षी बाजाराचा मूड काय?
भारतीय शेअर बाजार गेल्या वर्षी 1 नोव्हेंबर रोजी मुहूर्त ट्रेडिंगवेळी चांगला उसळला होता. सेन्सेक्स 335.06 अंक वा 0.42 टक्क्यांनी वाढून 79,724.12 वर आणि निफ्टी 99 अंक वा 0.41 टक्क्यांनी वधारून 24,304.30 वर बंद झाला होता. जवळपास 2904 शेअरमध्ये तेजी आली. 540 शेअर घसरले आणि 72 शेअरमध्ये कोणताही बदल दिसला नाही. अनेक गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला होता.