swt2014.jpg
99788
शिरोडा ः विद्यार्थ्यांना दिवाळी अंक भेट देण्यात आले.
गोगटे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे
विद्यार्थ्यांना दिवाळी अंक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २०ः गोगटे गुरुजी प्रतिष्ठान आजगावतर्फे मुलांना किशोर दिवाळी अंक भेट देण्यात आले. वाचन प्रेरणा सप्ताहाचे औचित्य साधून हा कार्यक्रम शिरोडा येथील खटखटे ग्रंथालयात झाला. यावेळी खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे, गोगटे प्रतिष्ठानचे समन्वयक विनय सौदागर तसेच कर्मचारी उपस्थित होते.
सुरुवातीला सौदागर यांनी दिवाळी अंकाची माहिती सांगितली आणि त्यातील काही कविता वाचून दाखविल्या. संचित पांढरे, वैभव पांढरे, मानसी पांचाळ, राही पांढरे, दक्ष गोवेकर, वरद पांढरे, निधी सावंत, प्रचिती शेटये, स्वरा मोरजकर, भूमिका शेटये आणि दीपिका शेटये आदी मुलांनी यात सहभाग घेतला. कार्यक्रमाला प्राची पालयेकर, अनिष्का रगजी, अपूर्वा सौदागर, सानिका मोरजकर यांचे सहकार्य लाभले. दिलीप पांढरे यांनी आजगावच्या मुलांची जाण्या-येण्याची व्यवस्था केली. हे किशोर अंक माधुरी आठल्ये यांनी पुरस्कृत केले होते. अंकाविषयी उत्तम परीक्षण लिहिणाऱ्या मुलांना पारितोषिक म्हणून खटखटे ग्रंथालयाचे सदस्यत्व बहाल करण्यात आले.